Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुःखद बातमी वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक नामदेवराव भागवत यांचे निधन


परळी प्रतिनिधी 


परळी येथील बँकनी कॉलनी भागातील रहिवाशी असलेले वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक नामदेवराव भागवत यांचे आज दि.26 गुरुवार रोजी  सकाळी 9:30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे दुःखद निधन झाले आहे. 

आज संध्याकाळी 8:30वाजता परळी येथील अमर धाम येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.

परळी शहरातील बँकिंग व्यवसायातील शांत, मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले वैद्यनाथ बँकेचे माजी सरव्यवस्थापक शिंपी समाजाचे ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यापारी नामदेवराव भागवत यांचे आज दिनांक 26 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9:30 वाजता दुःखद निधन झाले. 

नाथ चित्र मंदिर जवळ असलेल्या भागवत पॅलेस व भागवत मंगल कार्यालय याचे नरेंद्र भागवत मनोज भागवत यांचे ते वडील होत.

त्यांच्या पार्थिवावर आज दि.26  गुरुवार  रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता  परळी वैजनाथ येथे  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंतयात्रा राहते घर बँक कॉलनी येथून निघणार आहे.

सदैव हसरे व्यक्तिमत्व आणि सर्वांचे सु परिचित असलेले वैद्यनाथ बँकेचे सरव्यवस्थापक नामदेवराव भागवत भागवत साहेब म्हणून सर्वांना सुपरिचित होते.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रभू वैजनाथ चरणी प्रार्थना...

त्यांच्या पश्चात पत्नी,नरेंद्र भागवत आणि मनोज भागवत अशी दोन मुले,दोन मुली भाऊ,बहीण असा मोठा परिवार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या