Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गुडन्यूज..! राज्य सरकारने सरकारी नोकरदारांना मोठं गिफ्ट दिलं आहे काय आहे कुणासाठी तर वाचा.




मुंबई //
आगामी विधानसभा निवडणूका तोंडावर असताना राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सराकरी नोकरदारांची चांदी झाली आहे. महापालिका कर्मचार्‍यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्या निर्णयावर आजच शिक्‍कामोर्तब झाले आहे. विशेष बाब म्हणजे 2 सप्टेंबर पासून महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना हा 7 वा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.विधानसभा निवडणूका ऑक्टोबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबतचे वक्‍तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यापुर्वीच केलेले आहे. त्यापार्श्‍वभुमीवर राज्य सरकारने सरकारी नोकरदारांना मोठं गिफ्ट दिलं आहे. स्थानिक स्वराज संस्थांमधील नगरपालिका आणि मनपा कर्मचार्‍यांना 7 वा वेतन आयोग लागू होणार असल्यामुळे त्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे हे आता निश्‍चित झाले आहे.