Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गण..गणात..बोते..!! च्या जयघोषात संत गजानन महाराज पालखीचे परळीत 'या' दिवशी होणार आगमन..हे आहे संपूर्ण वेळपञक..


परळी // शेगावनिवासी समर्थ  श्री गजानन महाराज यांनी आजन्म पंढरीची वारी केली. तीच वारीची परंपरा पालखी रूपाने आजही सुरु आहे. गज, अश्व, पताका,  शिस्तबद्ध टाळकरी, गाणगंधर्व अशी गाणारी महाराज मंडळी असा पालखीचा राजवैभवी थाट पूर्वपरंपरागतच आहे.

 यंदा ५२ व्या वर्षी पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनाची आस घेवून निघालेल्या पालखीचे  परळी तालुक्यात दि.25 मंगळवार रोजी  वडगाव  मार्गे परळी  र्थमल येथे आगमन होईल.दि.26 बुधवार रोजी संत जगमिञ नागा मंदिर  येथे मुक्कामाला राहील     सातशे भाविकांचा सहभाग असलेल्या श्रींच्या पालखीचे भाविक
‘‘हिच माझी आस जन्मों-जन्मी होवो तुझा दास, ‘पंढरीचा वारकरी’ वारी चुको नेदी हरी’’ या संत वचनाप्रमाणे...समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज यांचा पंढरपूर पायदळवारी सोहळात सहभागी आहेत .