Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तब्बल तीन वर्ष उलटले ! तरीही पालखीतील वारकरी याच परळी ते अंबाजोगाई रस्तातील खड्ड्यातून शोधातायतं पायवाट...




परळी //  देवीचे भक्त व पालखी सोहळ्यातील भक्तभाविक वारकरी परळी ते अंबाजोगाई यारस्त्यावर कायम पायी प्रवास करणाऱ्याचे  प्रमाण जास्त  असल्याने या रस्त्याला मोठे महत्व आहे.

सध्या  आषाढी  याञा सुरू झाली आहे  अनेक  भागातुन  छोट्या मोठ्या  पालखी  दींड्याचे  परळीत  आगमन होऊन  पालखीसोहळ्यातील वारकरी पायीप्रवास करित परळीत  वैजनाथ  मंदीर व संत जगमिञ नागा मंदीर  येथे  मुक्काम   करून  पंढरपुर  कडे प्रस्थान  करत असतात  दोन दिवसानंतर  संत गजानन महाराज  व गुलाब  महाराज  यांची पालखी  परळीत  मुक्कामाला   येत असतात  या पालखीबरोबर   घोडे व हजारो वारकरी  सहभागी  असतात  या पालखीतील  वारकरी  यांना याच परळीतील  खड्ड्यातून शोधावी लागणार पायवाट...
आता  पावसाने या रस्त्यावर पायी चालणे देखील मोठे कठीण होऊन बसले आहे .या रस्त्याचे सुरू असलेले कामाबाबत कुठेही सूचना फलक लावल्याचे दिसून येत नाही.रस्त्याच्या दोन्ही बाजू उकरून ठेवल्याने या रस्त्यांवर पायी चालणेच कठीण होऊन बसले आहे.

आज परिस्थितीतीला कामाचा बराच काळ- वेळ उलटूनही चार पदरी असलेला हा रस्ता अर्धा म्हणजे एकपदरीसुध्दा झालेला दिसत नाही.
सर्व रस्ताच खड्डेग्रस्त झाला आहे.या रस्त्यांची  होणारी दुरवस्था आणि खड्ड्यांचे साम्राज्य यावर कोणालाही ...का वाटत नाही? स्वाभाविकच खड्ड्यांशिवाय रस्ता ही कल्पनाच पचनी पडत नाही. त्यामुळं ... वाटण्याइतके काही घडले, याची जाणीवच होत नाही.

 ३१ डिसेंबरपूर्वी रस्ते खड्डेमुक्त करू, अशा घोषणा सर्वांच्या कानी पडल्या होत्या. त्याला तब्बल तीन वर्ष  उलटले आहेत. परिस्थिती जैसे थे आहे. जिथे मुरुमाने खड्डे बुजविले तिथे चिखल झाला आहे. नाही म्हणायला मंत्र्यांचे दौरे लक्षात घेऊन काही ठिकाणी डांबराने खड्डे बुजविले. एकूणच खड्ड्यांचे दुष्टचक्र कायम सुरू आहे.  ही दुरवस्था संताप निर्माण करणारी आहे.  हे माञ खरे आहे .