Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक | पोदार लर्न स्कूल येथे शिक्षक दिन

आपला ई पेपर |


परळी |प्रतिनिधी 

दि 5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे आज दि.5 सप्टेंबर रोजी सकाळी शिक्षक दिन  साजरा झाला.यावेळी सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी डॉ.राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.

राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची सर्व कामे वाटून घेतली. एवढेच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातील भूमिका काही विद्यार्थ्यांनी पार पाडल्या.

शिक्षक दिनाच्या दिवशी एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो.अगदी तसाच अनुभव राजस्थानी पोदार लर्न शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यात आला.


थोडक्यात 5 सप्टेंबर या दिवशी सर्व शाळा विद्यार्थी शिक्षकांनी चालवली. शिकवणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांसाठी व  शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव होता. सकाळी साडेसात ते तीन या वेळामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन केले ,त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोगताचा कार्यक्रम पार पडला.  

शाळेचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचीव बद्रीनारायण बाहेती,उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, यांनी देखील शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर एक दिवसाचे विद्यार्थी शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी प्रास्ताविक भाषणात बोलताना सहसचिव धीरज बाहेती हे म्हणाले की, विद्यार्थ्यांना आता समजले असेल की शिक्षकांना त्रास देणे कसे चुकीचे आहे ! हे वाक्य ऐकून सर्व विद्यार्थी गप्प झाले. सर्व विद्यार्थ्यांनी शब्द दिला की, यापुढे आम्ही शिक्षकांच्या तासाला मस्ती करणार नाहीत.

या कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षक प्रमुख पाहुणे,कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर इतर सहकारी शिक्षक आणि एक दिवसाचे विद्यार्थी शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांचे आणि इतर सर्वच विद्यार्थ्यांचेआभार आर्या देशमुख आणि पद्मजा घोडके मानले,अशी माहिती शाळेचे प्राचार्य मंगेश काशीद यांनी दिली आहे.

शिक्षक दिन हा दिवस आमच्यासाठी कसा मजेशीर असतो. याविषयी आपले अनुभव सांगताना कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करताना सांची सचिन कागदे आणि आर्या संदीप घुगे यांनी मांडले. अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.

*पोदार स्कूलचा अनोखा उपक्रम*

*भारतीय परंपरानुसार संस्कृत मंत्रात* *उच्चारण रक्षाबंधनाचा सोहळा साजरा

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/podar_30.html*



*PODAR | खेळ हा प्रत्येकच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो |सहसचिव धीरज बाहेती*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_54.html*

*राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*

*पोदार लर्न स्कूल व स्वाराती रुग्णालय यांच्या विद्यमाने*

*स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिरात 105 रक्तदात्यांचा प्रशिस्तीपत्र, स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सन्मान..*

https://aplaepaper.blogspot.com/2023/08/105.html

*परळीत |PODAR |लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत,नृत्य व क्रांतिकारकांच्या वेशभूषा करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_15.html*
👇👇👇
*| Breaking | हेडलाईन्स न्यूज*
*https://aplaepaper.blogspot.com*
*आपला@पेपर |*आपली बात |आपली बातमी | Breaking |*
👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या