Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR |पोदार लर्न स्कूल येथे रक्तदान शिबिरात 105 रक्तदात्यांचा यथोचित सन्मान..

स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद



पोदार लर्न स्कूल व स्वाराती रुग्णालय यांच्या विद्यमाने
स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आपला ई पेपर |परळी|प्रतिनिधी

Podar |राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल व स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा आणि दैनिक मराठवाडा साथीचे मुख्यसंपादक स्वर्गीय मोहनलालजी (काकाजी)बियाणी यांच्या जयंती निमित्ताने आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन पत्रमहर्षी स्वर्गीय मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.




याकार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुखाआतिथी प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.गुरूप्रसाद देशपांडे, शाळेचे सचीव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, डॉ.राजेश जाजु,डॉ.प्रियंका आघाव,डॉ.स्वप्ना चाटे,संपादक सचिन स्वामी आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी बोलताना प्रसिद्ध डॉ देशपांडे म्हणाले की राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे शैक्षणिक कार्य सोबतच सामाजिक कार्यात खूप मोठा सहभाग आहे.रक्तदान शिबिर घेऊन या शाळेने कौतुकास्पद कार्य  केले आहे.विशेषतः परळीत चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून गेली चार वर्षांपासून दर तीन महिन्यात एकवेळ हे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत आहे. हे रक्तदान म्हणजे एखाद्याला जीवदान आहे

या रक्तदान शिबिरामध्ये  105 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे.राजस्थानीज पोदार लर्न स्कूल परळी गंगाखेड रोड येथे  सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. 









विशेष म्हणजे |Podar|शाळेचे सचिव बद्रीनारायण बाहेती, सौ.प्रेमलता बाहेती, धीरज बाहेती,सौ.दिपा बाहेती यांच्या सहपरिवाराने रक्तदान केले 






105 रक्तदात्यांनी रक्तदान करून, आपली सामाजिक बांधिलकी जपवणूक केली म्हणून यावेळी  शाळेचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी,सचीव बद्रीनारायण बाहेती,उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती,कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी,सहसचिव धीरज बाहेती,बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दीपा बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी विशेषतः या रक्तदान शिबिरात पालक व शाळेतील कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्ये बजावले म्हणून सर्व रक्तदात्यांचा रक्तदान शिबीरात प्रशिस्तीपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.अशी माहिती शाळेचे सचीव बद्रीनारायण बाहेती यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाचे संयोजक शाळेचे सहशिक्षक सुशील कटके ,सहशिक्षिका प्रिया जिबकाटे यांनी उपस्थित रक्तदाते पालक यांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.*

*परळीत |PODAR |लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत,नृत्य व क्रांतिकारकांच्या वेशभूषा करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_15.html*
👇👇👇
*| Breaking | हेडलाईन्स न्यूज*
*https://aplaepaper.blogspot.com*
*आपला@पेपर |*आपली बात |आपली बातमी | Breaking |*
👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या