Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR | राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा






खेळ हा प्रत्येकच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो |सहसचिव धीरज बाहेती

आपला ई पेपर |परळी |प्रतिनिधी



परळी गंगाखेड रोड महेश नगर येथील PODAR | राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे आज सकाळी 9वा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला यावेळी हॉकीतील दिग्गज खेळाडू आणि जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंह, प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनीही पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी देशात दि 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तसे तर प्रत्येक खेळ हा अनेक लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो. प्रत्येकजण कोणता ना कोणता खेळ प्रकार पसंत करतो. काहीजण खेळाची आवड करिअरच्या दिशेनं पुढे नेतात. तर काही लोक आपल्या आवडत्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना फॉलो करत खेळाचा आनंद घेतात. असे  मत यावेळी बोलताना PODAR | सहसचिव धीरज बाहेती यांनी व्यक्त केले

भारतदेशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभला आहे.यात हॉकीतील दिग्गज खेळाडू आणि जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद सिंह, लाखो देशवासियांसाठी प्रेरणादायी असलेले व्यक्तीमत्व दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांच्यासह सध्याच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले  क्रिकेटर सचिन तेंडुलकर या खेळाडूंचा समावेश आहे. या कार्यक्रमात विविध खेळाडूची माहिती व जीवन चरित्र विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दात व्यक्त केले तसेच यावेळी गुणवंत खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले दिवसभरात वेगवेगळ्या मैदानी खेळाचे नियोजन करण्यात आले होते. पोदार क्रिडा संकुलात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कबड्डी, खो-खो,क्रिकेट,बुद्धीबळ,कॅरम, बॅडमिंटन,रनिंग,लिंबू चमचा,स्केटिंग, पोत्यातून उड्या,फुटबॉल अशा अनेक खेळाचां आस्वाद घेतला. 

या सर्व खेळ प्रकाराचे नियोजन क्रीडा शिक्षक मारोती कांबळे, अनिल शिंदे, समन्वयक सुशील कटके यानी केले. 



या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यावेळी PODAR |अध्यक्ष चंदूलाल बियाणी,सचीव बद्रीनारायण बाहेती,उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी,सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंह,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्यासह शाळेतील विद्यार्थी पालक यांची उपस्थिती होती.

हा जागतिक क्रीडा दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले अशी माहिती शाळेचे  प्राचार्य मंगेश काशीद यांनी यावेळी दिली.*

*हेही वाचा BACHPAN |परळीत सर्वप्रथमच (AC) वातानुकूल स
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/ukg-lkg-ac.html*

*PARLI | राजस्थानी पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांची एक दिवशीय सहलीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_13.html*

*परळी शहराच्या वैभवात भर ; हा उपक्रम कौतुकास्पद...*

*PARLI |आरेना हा केवळ स्विमींग पुल नव्हे तर..आनंदाचे क्षण अत्यंत निवांतपणे...अनुभवा*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_6.html*

*बुकिंग सुरू असून आजच संपर्क करा..*

*धिरज बाहेती*
*7499547340*

हेही वाचा.. PODAR | राजस्थानी पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/rpls.html*


*PODAR |पोदार लर्न स्कूल येथे डोळ्यांचे आरोग्य आणि काळजी डॉ.झंवर यांनी केले विशेष मार्गदर्शन*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/podar.html*

ब्रेकिंग...*हेडलाईन्स न्यूज...*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

👇Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr


*संतोष बारटक्के*

*9423472426

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या