Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा कायापालट करू..उच्च दर्जाच्या अधिकाधिक रेलसेवा देऊ


उच्च दर्जाच्या अधिकाधिक रेलसेवा देऊ |भरतेश कुमार जैन डीआरएम 

   

आपला ई पेपर परळी वैजनाथ मध्य रेल्वे झोन अंतर्गत सिकंदराबाद चे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर डीआरएम) भरतेश कुमार जैन हे गुरुवारी सकाळी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर विशेष निरिक्षण दौर्यानिमित्त आले होते.परळी रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची  सदिच्छा भेट घेऊन त्यांना आपल्या काही विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. त्या मागण्या बाबतीत त्यांना चर्चेद्वारे योग्य ती जाणीव करून दिली. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या वेळी बोलताना डीआरएम श्री जैन यांनी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा कायापालट करून येथे प्रवाशांना अद्ययावत आणि उच्च दर्जाच्या रेल्वे सेवा देण्याचे निःसंदिग्ध आश्वासन या शिष्टमंडळास दिले. रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री चंदुलाल बियाणी आणि त्यांच्या परळीकर सदस्य यांनी दिलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्यांचा समावेश होता.


 नांदेड - पनवेल, निजामाबाद - पंढरपूर व इतर गाड्यांचे स्लीपर कोठे आणि जनरल कोचेस वाढवावेत ; १७६१४/१३ नांदेड पनवेल गाडी पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला पर्यंत तर १२७४९/५०  मछलीपट्टणम बीदर;१७०१०/०९ हैद्राबाद बीदर इंटरसिटी ; १६५७१/७२ यशवंतपूर बीदर ; १७६६३/६३ तांडूर परभणी एक्स्प्रेस इत्यादी गाड्या परळी वैजनाथ पर्यंत विस्तारित कराव्यात ; शिवाय ५१५२६/२५ मिरज परळी वैजनाथ पुढे परभणी जंक्शन पर्यन्त तर ५७५२२/२१ पूर्णा परळी वैजनाथ गाडी पुढे बीदर किंवा कुर्डुवाडी जंक्शन पर्यन्त करावी.

तसेच परळी वैजनाथ शहराच्या पूर्वेला टाकण्यात येणाऱ्या नियोजित बायपास लाईन तथा काॅर्ड लाईन वर नवीन अत्याधुनिक रेल्वे स्थानक त्वरित बांधण्यात यावे ; विकाराबाद जंक्शन ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाबरोबरच परभणी जंक्शन ते परळी वैजनाथ आणि लातूर रोड जंक्शन ते कुर्डुवाडी जंक्शन   रेल्वे स्थानकापर्यंतच्या रेल्वे मार्गांचे देखील दुहेरीकरण करण्यात यावे;परळी वैजनाथ स्थानकाच्या दोन्ही प्लॅटफॉर्म वर स्वयंचलित सरकते जिने - एस्कलेटर बसवावेत ; येथील रेल्वे स्थानक परिसरात "सुलभा इंटरनॅशनल" च्या धर्तीवर स्नानगृह व स्वच्छता गृह बांधावेत ; आरक्षण कक्षाची कामाची वेळ सध्याच्या आठ तासांहून अधिक म्हणजे किमान सलग बारा तास तरी करावी ;

यावेळी निवेदन देताना रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदुलालजी  बियाणी, संजय  आघाव, जी एस सौंदळे ,सत्यनारायण दुबे, हिरालाल बोरा,आत्मलिंग शेटे, आश्विन मोगरकर,प्रकाश चव्हाण, ओमप्रकाश बुरांडे, प्रकाश वर्मा, शरद कावरे यासह आदींची उपस्थिती होती

*बचपन क्युरी किड्स प्ले स्कूलमध्ये
फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात साजरी*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_18.html*

*परळी येथे राजस्थानीज
चॅरिटेबल संचलित बचपन क्युरी किड्स प्ले स्कूलमध्ये दि.15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात साजरी करण्यात आली..*

*राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल व स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय यांच्या विद्यमाने..*

*स्वर्गीय मोहनलालजी बियाणी यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_8.html*बीड जिल्हात राजकीय वातावरण तापले...काका-पुतण्यांचा संघर्ष वाढणार..का?

बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार..
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_16.html*

*| Breaking | music with हेडलाईन्स न्यूज*
*https://aplaepaper.blogspot.com*
*आपला@पेपर |*आपली बात |आपली बातमी | Breaking |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या