Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माजलगाव सिंदफणा शाळेची एनडीए क्विझ मध्ये क्षेत्रीय फेरीसाठी निवड

आपला ई पेपर माजलगाव प्रतिनिधी |


केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभागाने १३ जुलै २०२३ रोजी काढलेल्या परीपत्रकाद्वारे सीबीएसई संलग्नित शाळेतील विद्यार्थ्याना नॅशनल डिफेन्स अकादमी च्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. प्राचार्य अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक फेरीत शाळेतील तीन संघात एकूण सहा विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये दहावीतील सई कुलकर्णी,  ब्रिजेश कदम, प्रतीक मालाणी, अथर्व कराळकर, आलेक रेदासानी आणि नववीतील श्रीनिवास गोंडे यांचा समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व सहा विद्यार्थ्यांची क्षेत्रीय फेरीसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल सिंदफणा पब्लिक स्कूल वर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

सविस्तर वृत्त असे की ,नॅशनल डिफेन्स अकादमी ने आपल्या अस्तित्वाची ७५ गौरवशाली वर्षे साजरी करत आहे. जेव्हा देश 'आझादी का अमृत' महोत्सव साजरा करत आहे, भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत आहे. या गौरवशाली वर्षांच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, नॅशनल डिफेन्स अकादमी  विझक्विझ २०२३, एक आंतर-शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेत आहे. ही स्पर्धा राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या ७५ वर्षांच्या गौरवाचे स्मरण, प्रश्नमंजुषा स्पर्धेसह, भारताच्या संरक्षण दलांना आकार देण्यासाठी संस्थेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची आठवण म्हणून काम करेल. सदर प्रश्नमंजुषा संकरित मॉडेलमध्ये घेतली जात आहे . प्राथमिक, विभागीय आणि उपांत्य फेरी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. 

तसेच ग्रँड फायनल भव्य सुदान ब्लॉक समोर एनडीए, खडकवासला पुणे येथे आयोजित केली जाईल. या स्पर्धेमध्ये स्पर्धा सहभागीं विद्यार्थ्यांना त्यांचे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, क्रीडा, विज्ञान, मनोरंजन आणि भारताच्या सशस्त्र दलांचा इतिहास यासारख्या इतर क्षेत्रांवर  प्रश्न विचारले जातील. तसेच राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीतील स्पर्धकांना आयुष्यात एकदा नॅशनल डिफेन्स अकादमी ला भेट देण्याची आणि त्याची भव्यता अनुभवण्याची संधी मिळणार आहे. 

या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष वीरेंद्र सोळंके,सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम, क्रीडा संचालक दीपक माने, स्पर्धेचे  समन्वयक विजय फासाटे, संगणक विभाग प्रमुख राजेशकुमार, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

बीड जिल्हात राजकीय वातावरण तापले...काका-पुतण्यांचा संघर्ष वाढणार..का?

बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार..
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_16.html*

*| Breaking | music with हेडलाईन्स न्यूज*
*https://aplaepaper.blogspot.com*
*आपला@पेपर |*आपली बात |आपली बातमी | Breaking |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या