Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मूलभूत सोयी सुविधा, विविध विकास योजनांमधील प्रगती संदर्भात आढावा बैठक

आपला ई पेपर लातूर शहर प्रतिनिधी


लातूरचे आमदार मा. अमितभैय्या विलासराव देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री.बाबासाहेब मनोहरे व सर्व विभाग प्रमुखांसमवेत शहरातील मूलभूत सोयी सुविधा तसेच विविध विकास योजनांमधील प्रगती संदर्भात आढावा बैठक घेतली.

स्वच्छता,कचरा व्यवस्थापन,वाहतूक व्यवस्था तसेच अनियमित व अवैध बांधकामाच्या संदर्भाने जागरुक राहून गांभीर्यपूर्वक काम करण्याच्या सूचना बैठकीदरम्यान दिल्या आहेत.

1️⃣नियमित कचरा व्यवस्थापन करून स्वच्छतेवर लक्ष द्यावे.

2️⃣ अवैध आणि अनियमित बांधकामावर कार्यवाही करावी, बांधकाम परवान्याप्रमाणेच बांधकाम होईल याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी.

3️⃣ फुटपाथ, सर्विस रोडवरील अतिक्रमणे दूर करावीत.शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावावी.

4️⃣ साथीचे रोग पसरणार नाहीत यासाठी फवारणी व इतर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

5️⃣ शहरातील वीजपुरवठा तसेच स्ट्रीट लाईट नियमित सुरू राहील यासाठी व्यवस्था उभारावी. 

6️⃣ जाहिरातीसाठी रस्त्याच्या मधोमध उभारण्यात येत असलेले सेंटर पोल  धोकेदायक ठरू नयेत यासाठी सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच उभारावेत. 

7️⃣ नियमानुसार आणि दर्जेदार काम न करणाऱ्या कंत्राटदार एजन्सी काळ्या यादीत  टाकाव्यात. 

8️⃣ अधिकारी,कर्मचारी यांनी कुठल्याही दबावात काम करू नये.कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना कार्यमुक्त करावे. 

9️⃣ जुन्या गावभागातील पाईपलाईन बदलून घ्यावी.संपूर्ण शहरात पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाचे काटेकर पालन करावे. 

🔟 शहरात सुरू असलेले विकास प्रकल्प दर्जेदार पद्धतीने आणि जलद गतीने पूर्णत्वास न्यावेत

आदी सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या