Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा होणार..काका-पुतण्यांचा संघर्ष..

आपला ई पेपर | बीड


जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन आमदारांनी अजित दादांना पाठिंबा दिला, या सर्व बाबीच्या अनुषंगाने बीडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर सभा घेत अनेकांवर निशाणा साधला. ही सभा होत नाही तोच 

आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा येणाऱ्या 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये होत असून ही सभा बीड शहरातील छत्रपती संभाजी क्रीडांगण या ठिकाणी होणार आहे. सभेची वेळ दुपारी दोनची असून आज राष्ट्रवादीचे नेते वाल्मीक अण्णा कराड यांनी या ठिकाणची पाहणी केली. यावेळी बीड मतदार संघाचे नेते बळीराम गवते, युवा नेते बाळासाहेब गुजर यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


27 ऑगस्टला अजित पवारांची बीडमध्ये सभा असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सूत्रांनी दिली. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर संभाव्य सभेबाबत चाचपणी झाल्याची माहिती समोर आली. काका-पुतण्यांच्या या संघर्षाचा बीड जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या