Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

यांचा बंदोबस्त करणार कोण ? तब्बल 70 जणावर पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्लाबोल..








आपला ई पेपर परळी /बीड प्रतिनिधी 


परळी शहरात मिलिंद विद्यालय, महाविद्यालय परिसरात दहा ते पंधरा मोकाट कुत्र्याने सकाळ पासूनच धुमाकूळ घातला असून या परिसरात लहानथोर मंडळींनी की कुत्रे हा त्रास असल्याचा तक्रारी येथील नागरिकांनी केली असून याचा बंदोबस्त करावा अशी ही मागणी नागरिकांनी केली आहे.


सध्या परळी तालुक्यात ठीक ठिकाणी मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याची दहशत बसली असून असेच घटना नुकतीच बीड शहरात घडल्यामुळे यांचा बंदोबस्त कोण करणार असाच प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

बीडमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेचा अहवाल काही दिवसापूर्वीच आणि दैनिकात ही बातमी छापून आलीसभेच्या दिवशी 60 जणांना, तर आज पुन्हा 11 जणांना कुत्रे चावा घेतला 

गेल्या तीन दिवसात बीड शहर आणि परिसरात 60 पेक्षा अधिक जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे.  नुकतीच बीडमध्ये राष्ट्रवादीची सभा होती. त्याचदिवशीही सायंकाळी 32 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. काल दिवसभरात तिघांना तर आज सकाळपासुन 11 जणांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान तीन दिवसात अनेकांना चावा घेणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात आज सकाळपासून ११ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. गेल्या दोन दिवसांपासुन पिसाळलेल्या कुत्र्यांनी शहर आणि परिसरात धुमाकुळ घातलेला आहे. राष्ट्रवादीच्या सभेच्या दिवशी ३२ जणांना चावा घेतल्याची नोंद जिल्हा रूग्णालयात आहे तर उर्वरीत ३० जण इंजेक्शन घेवून बाहेरच्या बाहेर गेले. दि. २८ ऑगस्ट रोजी तिघांना चावा घेतल्याची नोंद जिल्हा रूग्णालयात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या