Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

श्री वैजनाथ मंदिराला फळ आणि फुलांची भव्य दिव्य आरास

 






महेश नवमी निमित्त राजस्थानी मल्टीस्टेट व पोदार लर्न स्कूलचा विशेष उपक्रम

परळी /प्रतिनिधी 

आज भगवान महेश नवमी असून त्या निमित्ताने राजस्थानी मल्टीस्टेटने आपल्या 12 व्या तर पोदार लर्न  स्कूलने 8 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ मंदिरात फळ आणि फुलांची भव्यदिव्य आरास सजावट केली आहे. आंबा, केळी, सफरचंद अशा विविध फळांसोबतच झाडांची पाने आणि फुले या माध्यमातून ही  नैसर्गिक सजावट करण्यात आली आहे. राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सदरची नेत्र दीपक आरास सेवा वैजनाथ चरणी अर्पण केली आहे.

द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिराचा परिसर आज आकर्षक फळ आणि फुलांच्या आरास करीत सजविण्यात आला आहे. राजस्थानी मल्टीस्टेटचा आज बारावा तर पोद्दार स्कूलचा आठवा वर्धापन दिन आहे महेश नवमीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही संस्था सुरू करण्यात आल्या होत्या महेश नवमी सोबतच संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या माध्यमातून वैद्यनाथ मंदिराला आकर्षक सजावटीने लक्षवेधी करण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करताच सदरची सजावट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सहा क्विंटल आंबे 101, डझन केळी आणि सोबतच केळीचे खांब आंब्याची पाने अधून मधून डोकावणारी फुले यामुळे वैद्यनाथ मंदिरातील आरास अधिकच आकर्षक झाली आहे. परळीत प्रथमच नैसर्गिक पद्धतीने आरास मांडण्यात आली आहे. आज सोमवार असून भाविकांची ही वैद्यनाथ मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी आहे नागरिकांकडूनही या आरास आणि सजावटीचे कौतुक करण्यात आले. केवळ आरसाच नाही तर फळाफुलांची रांगोळी सुद्धा वैद्यनाथ मंदिरात साकारण्यात आली आहे. अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या माध्यमातून प्रसिद्ध सजावटकार राकेश चांडक यांनी ही नेत्र दीपक आरास केली आहे.

आज दीपोत्सव

श्री महेश नवीचा निमित्ताने आज सोमवार दिनांक 29 रोजी सायंकाळी सहा वाजता वैद्यनाथ मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे मंदिराच्या उत्तर पायऱ्यावर सुमारे 5100 तेलांची दिवे लावण्यात येणार आहे.

शहरातील श्री दत्त मंदिर श्री.राम मंदिर (बालाजी मंदिर)येथे महेश नवीन निमित्त एक दृश्य साकारण्यात आले आहे सात फूट उंचीचे शिवलिंग व त्यासमोर सहा फूट उंचीची महादेवाची आकर्षक मूर्ती साकारण्यात आली आहे त्यासमोरच विशाल काय नंदी सुद्धा ठेवण्यात आला आहे आज दिवसभर वैद्यनाथ मंदिरातील आरास सायंकाळी होणारा दीपोत्सव आणि उत्तर पायऱ्या वर होणारी महाआरती हे आजच्या 

महेश नवमीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. परळी शहर  व परिसरातील भावीक भक्तांनी श्रींचे दर्शन घेतानाच आकर्षक आरास आणि सजावट पहावी तसेच सायंकाळी होणाऱ्या दीपोत्सव, श्री दत्त मंदिरात  महाआरतीसाठी सहभागी व्हावे असे आवाहन राजस्थानी मल्टीस्टेट व पोदार स्कूलच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या