Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दीपोत्सव..उत्तर पायऱ्यावरील महाआरती हे महेश नवमीचे वैशिष्ट्य ठरले...


परळी / प्रतिनिधी 

परळीत श्री महेश नवमी निमित्ताने आज बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथचा संपूर्ण परिसर लखलखित झाला होता आज सोमवार दि. 29 रोजी सायंकाळी सहा वाजता वैद्यनाथ मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला मंदिराच्या उत्तर पायऱ्यावर सुमारे 5100 तेलांची दिवे लावण्यात आले होते.






आज भगवान महेश नवमी असून त्या निमित्ताने राजस्थानी मल्टीस्टेटने आपल्या 12 व्या तर पोदार लर्न  स्कूलने 8 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ मंदिरात फळ आणि फुलांची भव्यदिव्य आरास सजावट आंबा, केळी, सफरचंद अशा विविध फळांसोबतच झाडांची पाने आणि फुले या माध्यमातून ही नैसर्गिक सजावट करण्यात आली होती.


राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सदरची नेत्र दीपक आरास, दीपोत्सव ही सेवा वैजनाथ चरणी अर्पण केली आहे.


तसेच शहरातील श्री दत्त मंदिर श्री राम मंदिर (बालाजी मंदिर) येथे महेश नवीन निमित्त एक दृश्य साकारण्यात आले आहे ज्या मध्ये सात फूट उंचीचे शिवलिंग व त्यासमोर सहा फूट उंचीची महादेवाची आकर्षक मूर्ती साकारण्यात आली आहे. त्यासमोरच विशाल काय नंदी सुद्धा ठेवण्यात आला आहे. हे मनमोहक सुंदर सजीव देखावा पाहण्यासाठी परळीकरांनी गर्दी केली होती. आज दिवसभर वैद्यनाथ मंदिरातील आरास सायंकाळीच्या  दीपोत्सव आणि उत्तर पायऱ्यावरील महाआरती हे आजच्या महेश नवमीचे वैशिष्ट्य म्हणता येईल,महेश नवमी निमित्त साकारण्यात आलेल्या कार्यक्रमाने परळीचे वातावरण भक्तीमय झाले या सर्व आकर्षक कार्यक्रमाचे कौतुक होत आहे.


*राजस्थानी पोदार लर्न स्कूलचे नावलौकिक,शैक्षणिक क्षेत्रांतील  प्रगतीमुळे सर्वत्र कौतुक...*

https://aplaepaper.blogspot.com/2023/05/blog-post_82.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या