Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आसुबाई उच्च मा. कला शाखेचा 98.24% तर विज्ञान शाखेचा 98.73 %निकाल...

 


परळी / प्रतिनिधी 
परळी तालुक्यातील महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित  मांडेखेल येथील आसुबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवले असून यामध्ये बारावी विज्ञान शाखेचा 98.73% टक्के तर कला शाखेचा 98.24%निकाल लागला आहे.

उच्च माध्यमिक विभागाच्या विज्ञान शाखेतील कु. ढाकणे मनीषा फुलचंद 81.17 % गुण घेऊन प्रथम, कु.ढाकणे प्रियंका वैजनाथ 80.33% ,कु.नेमाने अनिषा महारुद्र 79.5% गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय आल्या आहेत. तर कला शाखेतील कु.कोळेकर किष्किंधा माणिक 79.33 % गुण घेऊन प्रथम, कु.रुपणर प्रणिता सुंदर 76% कु.रुपणर शुभांगी आश्रुबा 76% ,चि.मुसळे गणेश गोविंद 74 अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत. विशेष प्राविण्यासह 15,प्रथम श्रेणीमध्ये 97, द्वितीय श्रेणीमध्ये 23 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव , संचालक मंडळ,प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या