Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BCCI |अंतर जिल्हा क्रिकेटमध्ये परळीला मिळाला प्रशिक्षक पदाचा मान

 




BCCI |अंतर जिल्हा
क्रिकेटमध्ये परळीला मिळाला प्रशिक्षक पदाचा मान 

आपला@पेपर/ Pune

पुणे येथे BCCI | मार्फत दि.26 डिसेंबर  2022 पासून होणाऱ्या अंतर राज्य गर्ल्स अंडर 15 एक दिवसीय क्रिकेट सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत सुरु असलेल्या अंतर जिल्हा सामन्यासाठी उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत संघ प्रशिक्षक म्हणून वेंकटेश त्रिंबक जोशी यांना संधी देण्यात आली आहे. याबद्दल अध्यक्ष विजय दंडनायक,सेक्रेटरी बंडगर सर आणि मुख्य प्रशिक्षक राम हिरापुरे सर यांचे मनपूर्वक अभिनंदन व कौतुक सर्वत्र होत आहे 


पुणे येथे सुरु असलेल्या मुलींच्या 1 दिवसीय अंतर जिल्हा अंडर 15  उस्मानाबाद संघाची पहिली मॅच सातारा संघासोबत 21 नोव्हेंबर 2022 रोजी डी वाय पाटील क्रिकेट ग्राउंड,साळुंबरे येथे झाली.


ज्यात नाणेफेक जिंकत उस्मानाबाद संघाने प्रथम गोलंदाजी करत सातारा संघास 36 या धावसंख्येत रोकले.


अनुक्रमे सानिका लोकरे 5 ओव्हर 9 रन 5 विकेट,आमणी नांदल 5 ओव्हर 1 मेडण 10 रन 1 विकेट, वैष्णवी म्हाळसकर 5 ओव्हर 2 मेडण 4 रन 1 विकेट तर परळीची वैष्णवी गवारे 4.3 ओव्हर 12 रन  देत 3 विकेट घेतल्या.



धावांचा पाठलाग करणाऱ्या उस्मानाबाद संघाने बिन गडी बाद सामना जिंकला. सामना विराची मानकरी सानिका दत्ता लोकरे ठरली.


तसेच दुसरा सामना सलग दुसऱ्या दिवशी 22 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी संघासमोर 406 रन चा डोंगर उभा करणाऱ्या बलाढ्य रायगड संघासोबत लोणी काळभोर येथील डिझायर स्पोर्ट्स ग्राउंड येथे झाला, ज्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाची करणाऱ्या रायगड संघास 158 धावत रोखले ज्यात अनुक्रमे आमणी नांदल 7.4 ओव्हर 37 रन 2 विकेट,वैष्णवी म्हाळसकर 7 ओव्हर 3 मेडण 15 रन 1 विकेट,वैष्णवी गवारे 5 ओव्हर 24 रन 1 विकेट,प्रीती शेळके 6.4 ओव्हर 3 मेडण 12 रन 2 विकेट, संचिता भोईटे 2 ओव्हर 17 रन 1 विकेट, संचया भोईटे 7 ओव्हर 2 मेडण 18 रन 3 विकेट घेतल्या.



धावांचा पाठलाग करणाऱ्या उस्मानाबाद संचाची 2 बाद 9 अशी अवस्था असताना  बॅटिंग ची सुरुवात करणाऱ्या प्रीती शेळके ( नाबाद 125 बॉल 30 रन )व 4 नंबर वर आलेल्या आमणी नांदल (58 बॉल 50रन )या जोडीने संघांसाठी 94 धावांची भागीदारी करत रायगड चे आव्हान संपुष्टात आणले, पुढे सानिका लोकरे 14 तर आर्या शेवाळे 10 रन जोडल्या आणि सामना 5 गडी राखत जिंकला. सामनाविराची मानकरी अष्टपैलू आमणी नांदल ठरली.


त्यानंतर गटातील शेवटचा सामना रत्नागिरी संघासोबत शुक्रवारी 24 नोव्हेंबर डी वाय पाटील ग्राउंड -साळुंबरे येथे पार पडला, ज्यात नाणेफेक जिंकून फलंदाची करणाऱ्या रत्नागिरी संघास 54 धावत गुंडाळत सानिका लोकरे 8 ओव्हर 3 मेडण 15 रन 4 विकेट,वैष्णवी म्हाळसकर 5 ओव्हर 15 रन 2 विकेट, तर परत परळी ची वैष्णवी गवारे 5 ओव्हर 16 रन 3 विकेट व प्रीती शेळके 7 ओव्हर 5 मेडण 6 रन 1 विकेट घेतल्या.


धावांचा पाठलाग करणाऱ्या उस्मानाबाद संघाने 7 गडी राखत सामना जिंकला.सामना विराचा मान सानिका लोकरे ने पटकावला.

उस्मानाबाद संघाने गट ब मधील आपले स्थान प्रथम स्थानी निश्चित करत सेमी फायनल मध्ये धाव घेतली.



संघाकडून अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सानिका दत्ता लोकरे गोलंदाजी मध्ये 3 सामन्यामध्ये 9 विकेट घेत प्रथम स्थानी  तर वैष्णवी लक्षमण गवारे 7 विकेट घेत 2 ऱ्या स्थानी आहेत.तसेच यष्टी रक्षक असणारी आर्या पोपट उमाप हि 7 गडी बाद करत प्रथम स्थानी आहे.


*परळी रेल्वे स्थानकामध्ये डिझेल इंजिनची धडधड बंद होणार...*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_22.html

15 गर्ल्स उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट क्रिकेट संघ अंडर 


सानिका दत्ता लोकरे (कॅप्टन )

प्रीती शेळके ( व्हाईस कॅप्टन )

वैष्णवीलक्षमण गवारे 

आर्या पोपट उमाप (विकेट कीपर )

अवंती धनंजय घोलप 

राजलक्ष्मी विनायक बोरकर 

कार्तिकी गोपाळ बोंबले 

आमणी यशवीर नांदल 

वैष्णवी सतीश म्हाळस्कर 

आर्या युवराज शेवाळे 

संचया सचिन भोईटे 

संचिता सचिन भोईटे

सौ.अमृता राम नांदवटे (संघ व्यवस्थापक )

श्री राम हिरापुरे सर (मुख्य प्रशिक्षक )

वेंकटेश त्रिंबक जोशी (प्रशिक्षक )


*परळीत गुगल मॅपमुळे*

*वैद्यनाथ मंदिर दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांना बसतोय चकवा...*
https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_72.html

*श्रद्धा,निधी नंतर आता कोणाची वाट पहातोय?*
https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_20.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या