Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Parli | उड्डाणपूल क्षमतेपेक्षा अधिकचा भार हा पेलतो आहे...ही सततची वाहतुक कोंडी



परळीचा उड्डाणपूल क्षमतेपेक्षा अधिकचा अधिभार हा पुल पेलतो आहे...वाहतुक कोंडी प्रश्न कायमच

आपला@पेपर/ Parli 

रेल्वे उड्डाणपूलासाठी तीस कोटी रुपयांचा मंजूर निधी गेला...कुठे?  

समांतर उड्डाणपूलाची आणखी किती प्रतिक्षा करावी लागेल बीड आणि गंगाखेड रस्त्यास जोडणाऱ्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल परळीची वाढती लोकसंख्या आणि बाहेर गावावरून येणारी वाहतुकीला कमी पडतो  आहे. याच डाॅ.शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाण पुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे.हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत.असल्याने एखादे वाहन जरी बंद पडले तरी त्याचा वाहतुकीवर  परिणाम होतो हे नेहमी अनुभवाला येणारे चित्र असते.



हा उड्डाणपूल भार पेलण्याच्या क्षमतेपेक्षा अधिकचा अधिभार हा पुल पेलतो आहे.मोठी दुर्घटना होवू शकते हा धोका लक्षात घेऊन  या पुलाचे बांधकाम लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल आॅडीट करावे अशी मागणी परळीतील जागरूक नागरिकांनी यांनी केली आहे.



परळी शहरात येणारी जाणारी वाहतूक सतत वाढते आहे. हे लक्षात घेऊन या उड्डाणपूलाला आणखी एक समांतर उड्डाणपूलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आलेली आहे. आतापर्यंत या उड्डाण फुलासाठी प्रयत्न करणारे तीन पालकमंत्री होऊन गेले काहींनी तर लवकरच असा समांतर उड्डाणपूल निर्मिती सुरू होईल असा पालकमंत्र्यांनी मोठा गाजावाजा केला पण पुढे याचे काय झाले? हा प्रश्न आजही कायमच आहे.

 


याउड्डाणपूलावर आणखी किती जणाचे बळी दिले जाणार आहेत. दररोजच दुर्दैवी घटना घडत आहेत.यामुळे पुन्हा एकदा वाढती वाहतूकीचा विचार करता समांतर उड्डाणपूलाचा मुद्दा पुढे आला आहे. परळी येथे समांतर रेल्वे उड्डाणपूलासाठी तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता  तोही कुठे गेला हे काम कधीसुरू होणार ते अद्यापही गुलदस्त्यातच आहे.


आणखी किती प्रतिक्षा करावी लागेल हा प्रश्न कायमचा तातडीने मार्गी लावण्यासाठी परळीकरांना कोणत्या नेत्याचे मार्गदर्शन व नेतृत्व लाभणार व मार्गदर्शनाखाली जनआंदोलन होईल हे येणारी निवडणूक आणि येणारा काळच सांगणार


*परळीत गुगल मॅपमुळे*

*वैद्यनाथ मंदिर दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांना बसतोय चकवा...*
https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_72.html

*श्रद्धा,निधी नंतर आता कोणाची वाट पहातोय?*
https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_20.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या