Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत गु..गल मॅपमुळे मंदिर दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांना बसतोय चकवा...


*परळी रेल्वे स्थानकामध्ये डिझेल इंजिनची धडधड बंद होणार...*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_22.html



परळीत गुगल मॅपमुळे मंदिर
दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांना बसतोय चकवा...

बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मध्ये स्वयंभू ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग ज्याचा उल्लेख बारा ज्योतिर्लिंग स्तोत्रामध्ये परल्याम् वैद्यनाथंच् असा केला आहे. प्रभू वैद्यनाथ मंदिर विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक बाजू परळी शहरात मांडल्या जात आहेत. परंतु आजही परळी शहरात प्रवेश करताना मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दिशा फलकांची गरज आहे.



परळीमध्ये बाहेर गावावरुन प्रवासी दर्शनासाठी येतात तेव्हा मौ.अब्दुल कलाम चौक येथे गुगल मॅपच्या आधारे जेव्हा बाहेरील प्रवासी दर्शनासाठी येतात तेव्हा विद्यानगर भागातील शंभू महादेवाचा मंदिर हेच वैजनाथाचे मंदिर समजून अनेक प्रवासी यामुळे चकवा खात आहेत. 



परळी शहरांमध्ये वैद्यनाथ को.च्या माध्यमातून विकासाची गंगा जरूर वाहेल परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये दिशादर्शक फलकाची नियोजन ही महत्त्वपूर्ण बाब आहे. सध्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रवाशाची होणारी ही गैरसोय संबंधितानी दखल घ्यावी व गैरसोय टाळावे अशी मागणी अनेक नागरिकांच्या वतीने होत आहे.

तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी प्रवाशांची होणारी दूर करावी अशी मागणी होत आहे.


*श्रद्धा,निधी नंतर आता कोणाची वाट पहातोय?*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_20.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या