Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीकरांनसाठी विशेष सूचना..! श्रावण सोमवारी वैद्यनाथ मंदिरकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे .कसा तर वाचा ...



परळी //  सोमवार दिनांक 05 ऑगस्ट 2019 रोजी श्रावण महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यनाथ मंदिर कडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत.यामुळे भक्तांना आपल्या दुचाकी,चारचाकी मंदिर परिसरात नेता येणार नाहीत.

श्रावण महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यनाथ मंदिर कडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत .वैद्यनाथ मंदिर कडे जाणाऱ्या वाहतुकीत कोंडी होऊ नये म्हणून  वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे .तो पुढीलप्रमाणे.अब्दुल कलाम चौकातून येणारे वाहने पोलीस अधिकारी निवासस्थानाच्या पुढे जाणार नाहीत. शिवाजी चौक,टॉवर मार्गे येणारी वाहने आर्य वैश्य मंगल कार्यालयापुढे जाणार नाहीत.अंबेवेस मार्गे येणारी वाहने तीळकरी मेडिकल,हालगे गार्डन (गणपती मंदिर)पुढे जाणार नाहीत याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी असे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे