Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जगाने अंध म्हणून हिणवलेल्या,भावेश भाटिया यांनी उभे केले करोडोंचे साम्राज्य

 यशस्वी उद्योजकांची यशोगाथा /आपला ई पेपर 


विद्यार्थी जगात चौफेर ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून आज राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे मॉर्निंग असेंबली मध्ये एका यशस्वी उद्योजकाची ओळख या अनुषंगाने स्कूलचे अकॅडमी डायरेक्टर बी.पी सिंग यांनी विद्यार्थ्यांना या दिव्यांग यशस्वी उद्योजकाचा परिचय व लायब्ररीतील पुस्तकाचे वाचन करण्याचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शालेय अभ्यासाबरोबरच घडामोडीचा अभ्यास पुस्तक वाचनातून आत्मविश्वास वाढवा हा उद्देश समोर ठेवून राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

 दृष्टिहीन असूनही भावेश भाटिया यांनी आपल्या धाडस आणि जिद्दीच्या जोरावर असं काही केले, ज्याची कल्पना करणे प्रत्येकासाठी सोपे नाही. मेणबत्तीचा व्यवसाय करत त्यांनी करोडोंचे साम्राज्य उभे केले. भावेश यांची दृष्टी लहानपणापासूनच कमजोर होती, पण शालेय काळापासून कलाकुसर हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांनी एक स्ट्रीट वेंडर (रस्त्यालगत सामान विकणारा) म्हणून सुरूवात केली आणि आज त्यांची गणना देशातील यशस्वी उद्योगपतींमध्ये होते.

देशातील तब्बल ९००० दिव्यांगजनांना रोजगार देऊन त्यांनी आदर्श एका निर्माण केला आहे. त्यांची उत्पादने केवळ देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये खरेदी केली जातात. ५२ वर्षीय भाटिया यांची कंपनी सनराइज कँडल सध्या १० हजारहून अधिक मेणबत्त्या डिझाइन करते. जगभरात १००० बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, ज्या त्यांच्याकडून उत्पादने खरेदी करतात.

अंध म्हणून IIT ने प्रवेश नाकारला, व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला; अमेरिकेत शिकून बनला उद्योजक

कोण आहेत भावेश भाटिया?

भावेश भाटियाची यशोगाथा प्रेरणादायी नव्हे तर उत्कटता, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण शक्तीचा पुरावा आहे. एका छोट्या गावात जन्मलेल्या भावेश यांना लहानपणापासूनच तंत्रज्ञान आणि उद्योजकतेची आवड होती. आपल्या क्षमतेवर त्यांनी दृढ विश्वास ठेवून, अशा प्रवासाला सुरुवात केली जिने त्यांना शेवटी उल्लेखनीय कामगिरीकडे नेले.

आधी नाकारलं, मग ज्या कंपनीत ६७० रुपयांवर केली नोकरी, तिथेच बनले बॉस; दान केली शेकडोंची संपत्ती आंधळा...आधंळा म्हणून चिडवलं

भावेश भाटिया यांच्या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात बालपणापासूनच झाली होती, परंतु वयाच्या २३ व्या वर्षी डोळ्यांशी संबंधित अंतर्गत समस्येमुळे त्यांची दृष्टी गेली आणि त्यांना आयुष्यातील मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला. मोठा धक्का सहन करून त्यांनी आपल्या आईच्या कर्करोगावर उचार करवण्याचा निर्धार केला आणि हॉटेल व्यवस्थापक म्हणून काम केले. 

भावेश यांची दृष्टी बालपणापासूनच कमी होती. त्यामुळे त्याला विद्यार्थीदशेपासून मोठा संघर्ष करावा लागला. शाळेतील इतर मुले भावेशला आंधळा... आंधळा म्हणून चिडवायचे. या दररोजच्या प्रकाराला कंटाळून त्याने शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला होता, पण आईच्या शब्दांनी त्यांचे मार्गदर्शन केले.

आयुष्यातील टर्निंग पॉईंट

१९९९ मध्ये भावेश यांनी मुंबईतील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडमध्ये प्रशिक्षणासाठी नाव नोंदवून एक परिवर्तनकारी पाऊल उचलले. तिथे त्यांनी साध्या मेणबत्त्या बनवण्याची कला आत्मसात केली. दररोज रात्री ते परिश्रमपूर्वक मेणबत्त्या तयार करून महाबळेश्वरच्या स्थानिक बाजारात एका कार्टमधून विकायचे. कार्ट ५० रुपये प्रतिदिन भाड्याने देऊन त्यांनी काळजीपूर्वक दुसऱ्या दिवशीच्या उत्पादनासाठी कच्चा पुरवठा करण्यासाठी दररोज २५ रुपये वाचवले.

१९९४ मध्ये मेणबत्ती कंपनीची स्थापना केली

आवड आणि जिद्द करूनही भावेशला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, विशेषत: त्यांच्या दृष्टीदोषामुळे कर्ज मागताना. तथापि, विशेषत: अंध व्यक्तींना आधार देणाऱ्या सातारा बँकेकडून १५ हजार रुपयांच्या कर्जाचे त्यांचे नशीब बदलले. आर्थिक बळावर त्यांनी पंधरा किलो मेण, दोन रंग आणि एक हातगाडी अवघ्या पन्नास रुपयांत खरेदी केली. यामुळे सनराईज कॅंडल्सच्या अविश्वसनीय प्रवासाची सुरुवात झाली ज्याने त्याला एक अत्यंत यशस्वी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय स्थापन करण्यास प्रवृत्त केले.

कच्चा माल खरेदी करण्यासाठी धडपड करण्याच्या दिवसांपासून भावेशची कंपनी सनराईज कॅंडल्स आता यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. साध्या, सुगंधित आणि अरोमाथेरपी मेणबत्त्यांसह ९००० डिझाइनची प्रभावी श्रेणी तयार करण्यासाठी ते दररोज तब्बल पंचवीस टन मेणाचा वापर करतात.*

हेही वाचा..अबब परळीत अवतरली महाकाय अगडबंब चप्पल*

🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_8.html*

अप्रतिम.. भजन तुम्ही आतापर्यंत ऐकले नसेल..
*देवा सुखा कारणे.. जबरदस्त पहाडी आवाजातील गाणे एकदा ऐका*
🔴👇👇👇🎊🎊🎊
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_58.html*

अबब..परळीत 13 कोटी ₹ निधीचा भ्रष्टाचार ?

🔴👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/13.html*

*Breaking News|
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या