Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

CBSE | प्राचार्य अन्वर शेख यांची बीड सहोदया च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

 आपला ई पेपर/माजलगाव /प्रतिनिधी


विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूल चे प्राचार्य अन्वर शेख यांची बीड जिल्हा सीबीएसई स्कूल सहोदया कॉम्प्लेक्स च्या अध्यक्षपदी आज बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, बीड येथील गुरुकुल पब्लिक स्कूल येथे बीड जिल्हयातील सर्व सीबीएसई शाळांच्या प्राचार्यांची बैठक पार पडली. या बैठकीस बीड जिल्ह्यातील २३ शाळांच्या प्राचार्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत बीड सहोदया स्कूल कॉम्प्लेक्स ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व प्राचार्यांनी एकमताने अध्यक्ष पदासाठी प्राचार्य अन्वर शेख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि बीड जिल्हा सीबीएसई स्कूल सहोदया कॉम्प्लेक्स च्या अध्यक्षपदी निवड केली.प्राचार्य अन्वर शेख यांनी यापूर्वी इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई चॅप्टर चे संस्थापक सचिव आणि नंतर उपाध्यक्ष तसेच मराठवाडा मित्र परिवार नवी मुंबई च्या कार्यकारिणी मध्ये सुद्धा काम केलेले आहे. बीड जिल्ह्यातील सर्व सीबीएसई शाळांना एकत्रित आणून बीड सहोदया स्कूल कॉम्प्लेक्स स्थापन करण्यात अन्वर शेख यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा बीड जिल्ह्यातील सहोदया कॉम्प्लेक्स ला होईल तसेच त्यांच्या रूपाने बीड जिल्ह्यातील सर्व सीबीएसई शाळांना एक अनुभवी,संयमी आणि मनमिळाऊ नेतृत्व मिळाले असे मत बीड जिल्हा सीबीएसई शाळा समन्वयक शितल सर्वज्ञ यांनी व्यक्त केले.

त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष वीरेंद्र सोळंके,सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक नीला देशमुख, उपप्राचार्य राहुल कदम, शैक्षणिक विभाग प्रमुख राजेंद्र सवई, सुजा चाको, धनंजय सोमवंशी, अर्चना जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

अप्रतिम.. भजन तुम्ही आतापर्यंत ऐकले नसेल..

*देवा सुखा कारणे.. जबरदस्त पहाडी आवाजातील गाणे एकदा ऐका*

🔴👇👇👇🎊🎊🎊
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_58.html*

*Breaking News|किंमत करा त्यांची जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात*

*कारण जगात काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात*

*Breaking News|
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*