Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीसह 13 कोटी ₹ निधीचा भ्रष्टाचार ?



जिल्हाधिकाऱ्यांनी परळी व बीड वन विभागाचीही चौकशी करावी- रानबा गायकवाड

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी



बीड जिल्हा नियोजन विभागाकडून चालू या आर्थिक वर्षात बीड जिल्हा वन विभागाला दिलेल्या 13 कोटी रुपयांचा निधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप डीपीआय या पक्षाने केल्यानंतर बीड जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ मुंडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.या प्रकरणी विभागीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या चौकशी समितीने परळी वन विभागाचीही चौकशी करावी अशी मागणी रानबा गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे.
याबाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, बीड जिल्हा नियोजन विभागाने ..2022-23 या आर्थिक वर्षात वन विभागाला 13 कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या पक्षाने करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौकशी
करून तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनाची दखल घेऊन बीडच्या जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ मुंडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.बोगस मजूर,मित्रांची व नातेवाइकांची नावे दाखवून निधी हडप केल्याचा आरोप डीपीआयने केला आहे.परळी तालुक्यात वनविभागाच्या वतीने अनेक डोंगरावर करण्यात येणाऱ्या अनेक कामांवर मजूर कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात जेसीबी मशिनने कामे करण्यात येतात. जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ मुंडे यांनी विभागीय चौकशी समितीला परळी वनविभागाच्या ..2022 23 या आर्थिक वर्षातील कामांची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही रानबा गायकवाड यांनी केली

आहे.
*आजही विश्वास कायम...राजस्थानी पतसंस्थेत ठेवीदारांने केली एक लाख रुपयांची गुंतवणूक*

🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_47.html*

*Breaking News|
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या