आपला ई पेपर |परळी|
परळी येथे राजस्थानीज चॅरिटेबल संचलित BACHPAN | बचपन स्कूलमध्ये आज दि.15 ऑक्टोबर रविवार रोजी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र महोत्सवानिमित्त आई भवानीच्या वेगवेगळ्या वेशभूषातील अवताराची स्पर्धा बचपन स्कूलमध्ये घेण्यात आली होती.
याकार्यक्रमाचे अध्यक्षा बचपन स्कूलच्या प्राचार्या सौ.दीपा बाहेती, तर प्रमुख पाहुण्या म्हणून राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या उपाध्यक्षा सौ.प्रेमा बाहेती उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की नारीने नारीचा सन्मान केला पाहिजे.
सर्वप्रथम माता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात अनेक मातांनी या वेशभूषा स्पर्धेत भाग घेऊन आई भवानी मातेच्या वेगवेगळ्या रूपाची वेशभूषा करून आकर्षक असे सजावट व माता आई भवानीचे वेगवेगळे अवतार साकारले होते. अप्रतिम असा सहभाग यातून दिसून आला.
अप्रतिम असा व्हिडिओ...👇👇👇
*BACHPAN परळीत नवरात्रोत्सवात.. मातां आई भवानीची वेशभूषा स्पर्धा 2023*
✍️👇👇👇
*https://www.instagram.com/reel/CybedYHSW7g/?igshid=M2MyMzgzODVlNw==*
Social Plugin