Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तुळजापूरच्या दिव्य ज्योतीचे परळीकरांना घेतले दर्शन; शहरातून भव्य शोभायात्रा

 


नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सव 2023

जेष्ठ नेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या हस्ते घटस्थापना व मान्यवरांच्या हस्ते महाआरती

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी

महाराष्ट्र राच्या कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेले नाथ प्रतिष्ठान आणि राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. रविवार, दि.१५ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. तर सकाळच्या सत्रात तुळजापूर येथून आणण्यात आलेल्या ज्योतीची परळी शहरातून भव्य-दिव्य शोभायात्रा काढण्यात आली.


नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दुर्गोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. दरवर्षी नाविण्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत असून, भव्य दिव्य देखावे जिल्ह्याचे आकर्षण ठरतात. गतवर्षी माता वैष्ण देवीचा भव्य दिव्य देखावा सादर करण्यात आला होता. तर यंदा राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या माता तुळजा भवानी मंदीरचा हुबेहूब सजिव देखावा राकेश चांडक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. रविवारी सकाळी ९ वाजता तुळजापूर येथून अणण्यात आलेली दिव्य ज्योत परळीत दाखल झाली. वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोर या ज्योतीचे ढोलल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आला. यानंतर ही ज्योत बियाणी यांच्या निवासस्थानी आणण्यात आल्यानंतर ज्योतीची विधिवत पुजाअर्चा करण्यात आली.

दै.मराठवाडा साथी कार्यालय येथून दिव्य ज्योतीच्या शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. आश्वारूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे, त्यांच्या पाठीमागे टाळ, मृदंग आणि विणा घेवून वारकरी व त्याचबरोबर विविध वेशभूषा केलेले कन्हैय्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी लेझीमपथकात सहभागी झाले होते. ढोल, ताशे, संभळ अदी वाद्यांच्या निनादात या शोभायात्रेला प्रारंभ झाल्यानंतर ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आलेल्यानंतर छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बसस्थानक, एकमिनार चौक, स्टेशन रोड, मार्केट कमिटी, सुभाष चौक, रोडे चौक, टॉवर , परत मार्केट कमिटी, अरूणोदय मार्केट मार्गे ही दिव्य ज्योत  औद्योगीक वसाहत येथे आणून देखावा स्थळी स्थापीत करण्यात आली. दिव्य ज्योत शोभायात्रेने परळी शहरातील नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.


वाल्मिक अण्णा कराड यांच्या हस्ते आयुष्मान भारत कार्डचे वितरण

आरोग्य मित्र, महाराष्ट्र राज्यच्या वतीने अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष उपक्रम नवरात्रोत्सवात हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जेष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या हस्ते करण्यात आला असून, त्यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेतील अभा कार्डचे नागरीकांना वितरण करण्यात आले. या कार्डच्या मार्फत केंद्र सरकारकडून कुठल्याही आजारावर ईलाज करण्यासाठी ५ लाख रूपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जाऊ शकतात. या उपक्रमाचा रविवारी शुभारंभ झाला असून, मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम राबविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन वाल्मिक अण्णा कराड यांनी दिले.

आजपासून सर्वांसाठी देखावा खुला

नाथ प्रतिष्ठान आणि राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुर्गोत्सव २०२३ मध्ये यावर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या माता तुळजा भवानी मंदीराचा हुबेहूब सजिव देखावा तसेच प्रभू वैद्यनाथ देवाखा विशाल स्वरूपात निर्माण करण्यात आला आहे. परळी शहरवासीयांसह सर्वांसाडी हा देखावा आजपासून पाहता येणार असून, त्यासाठी सर्वसाधारण पास शुल्क फक्त २० रूपये तर विशेष शुल्क ५० रूपये एवढे नाममात्र ठेवण्यात आले आहे. देखावा स्थळी हे पास पाहण्यास आलेल्या नागरीकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहीती संयोजकांकडून देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या