Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|PODAR |राजस्थानी पोदार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थी संसदेचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

 


आपला ई पेपर |parli |PODAR |



परळी राजस्थानीज पोदार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थी संसद पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आज दि. 8 रोजी सकाळी आयोजन केले होते. यानिमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून परळी शहर पोलीस ए.पी.आय गोरखनाथ दहिफळे,राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी,सचीव बद्रीनारायण बाहेती उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या पूजनाने झाली.त्यानंतर निमंत्रित प्रमुख पाहुण्यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 


सध्या राजकारण आणि राजकीय परिस्थिती याबाबत प्रत्येकाला सखोल ज्ञान असणे अतिशय महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनात अनेक घटना घडतात.त्यावेळी योग्य निर्णयावर यश अवलंबून असते.विद्यार्थी जीवनात कायदा आणि सुव्यवस्था याचेही सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.आपण राहत असलेल्या समाजाचे प्रश्न आणि समस्या यावरही निर्णय घेताना महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष कशाप्रकारे दिले पाहिजे त्यासाठी नेतृत्व हे महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना परळी शहर पोलिस स्टेशनचे एपीआय दहिफळे हे म्हणाले. 

©PODAR |राजस्थानी पोदार स्कूलच्या


विद्यार्थ्यांच्या  विद्यार्थी जीवनामध्ये नेतृत्व कौशल्य विद्यार्थ्यांना अधिक आत्मविश्वासाने प्रभावी ठरावे.तसेच शिक्षणासोबतच जीवनात येणारी वेगवेगळी आव्हाने स्वीकारण्यास मदत व्हावी, याच अनुशंगाने हा विद्यार्थी संसदेचा पदग्रहण सोहळा आयोजित केला होता.

|PODAR |राजस्थानीज् पोदार लर्न स्कूलमध्ये


विद्यार्थी संसदेची स्थापना दरवर्षी केली जाते.त्याप्रमाणेच सन 2023-2024 साठी विद्यार्थी संसद प्रमुख अवधूत कांदे,विद्यार्थी संसद प्रमुख सांची कागदे,विद्यार्थी संंसद विविध प्रमुख सदस्य आर्या घुगे,अन्विती कुरूडे आणि अवनी काळे, हरिप्रसाद गिरी,सुमित राठोड,आनंद वाघमारे,पंकज मुंडे, सुजल लोढा या विद्यार्थ्यांची निवड संपूर्ण मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली आहे.

या विद्यार्थ्यांचा औपचारिक पदग्रहण सोहळा आज दि.8 मंगळवार रोजी |PODAR |राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी,सचीव बद्रीनारायण बाहेती,उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,सहसचिव धीरज बाहेती,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अवनी मुंडे, प्रीती जामगे श्रुती भुतडा, सायली जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक शेख फरहात यांनी केले. अशी माहिती शाळेतील शिक्षक सुशील कटके यांनी दिली  आहे.

या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात पालकांचा सहभाग होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, संघ सदस्य,विद्यार्थी,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले


*डोळ्यांच्या काळजी अश्याप्रकारे घ्या -डॉ.गोपाल झंवर*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/podar.html*

*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*


*थेट live...PODAR | राजस्थानी पोदार स्कूलमध्ये विद्यार्थी संसदेचा आज पदग्रहण सोहळा*

👇👇👇 क्लिक द फेसबुक लाईव्ह
*https://fb.watch/mhsQeW5Jsu/?mibextid=YvzCfH*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/podar.html*

*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व
बातम्यांसाठी
संपर्क*
*संतोष बारटक्के*

*9423472426*.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या