आपला ई पेपर परळी
ज्येष्ठ विचारवंत,लेखक हरी नरके यांचे येथे मुंबईत एशियन हार्ट रुग्णालयात -हदयविकाराने दुःख निधन झाल्याची दुःखद घटना घडली असल्याने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त करत त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पित केली आहे.
प्रा.हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत.
ओबीसीं
मध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके,'महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा' पुस्तकांसह अनेक दर्जेदार साहित्य त्यांनी वाचकांनी दिली आहेत.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतिने परळी शहरात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रा.हरि नरके यांना आणण्याचा योग आला.त्यांना ऐकण्यासाठी परळीकरांनीही मोठी पसंदी दिली होती.आज जेव्हा सकाळी प्रा.हरि नरके यांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा धक्काच बसला असुन एका विचारवंत,लेखक साहित्य क्षेत्रातील मोठे प्रस्त,
समाज प्रबोधनकार गमवला असल्याचे शोकभावना मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त केली असुन त्यांचे दर्जेदार साहित्य नेहमी अजरामर राहिल असे प्रतिपादन श्री बियाणी यांनी केले.
Social Plugin