Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भाजी व फळ विक्रेते प्रश्नी विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने कृ.उत्पन्न बाजार समितीला दिले निवेदन

भाजी व फळ विक्रेत्यांना एकत्र बसवण्यात यावे अन्यथा भाजीविक्रेत्यांसह विविध पक्षांच्यावतीने कृ.ऊ.बा. समिती समोर तीव्र आंदोलनाचा इशारा

आपला ई पेपर



परळी वैजनाथ भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते यांना सर्व सुविधायुक्त जागेत एकाच ठिकाणी बसवून नागरिकांची गैरसोय टाळावी म्हणून विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडेंना निवेदन दिले. यावेळी 'दोन दिवसांत भाजी व फळ विक्रेते यांना सुविधा देऊन एकत्र बसवणार' असे आश्वासन सभापती सूर्यभान मुंडेंनी दिले.

संभाजी ब्रिगेड, शिवसेना (उबाटा) काँग्रेस आय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट एम आय एम, वंचित बहुजन आघाडी, आणि माकप या पक्षाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात "परळी शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतरित करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वे नं - 499 या जागेत बसवले आहे.फळ विक्रेत्यांना मात्र मोंढा मार्केट मध्येच बसवले आहे. भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते हे एकाच ठिकाणी असावेत त्याचे कारण म्हणजे शहरातील फळ खरेदी व भाजी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला व वयोवृद्ध नागरिक येत असतात.सध्या भाजीपाला विक्री व फळ विक्री करणाऱ्या व्यापारपेठेत एक ते दीड किलोमीटरचे अंतर असून पायी चालत आलेल्या महिला व जेष्ठ नागरिकांना भाजीपाला आणि फळ दोन्ही खरेदी साठी एक ते दीड किलोमीटरचे अंतर चालत जावे लागत आहे.

नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी भाजी व फळ विक्रेते एकच ठिकाणी बसवावेत ज्या जागेमध्ये लाईट,शौचालय, पाण्याचा हौद, पिण्याच्या पाण्याची सोय, शेड व ओटे, सुरक्षा यासह सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावी.

विशेष बाब आम्ही नमूद करतो की भाजी व फळ विक्रेत्यानां कृ.ऊ.बा. समिती कडून मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत परंतु त्यांच्याकडून दरदिवशी प्रत्येकी २० रुपये प्रमाणे कर वसुली केली जाते. ही करवसुली व्यवहार्य नसून सर्वसुविधा दिल्या शिवाय करवसुली करू नये. आज पर्यंत केलेल्या वसुलीचा वार्षिक हिशोब देण्यात यावा अशीही मागणी निवेदनात केली आहे.

     तत्काळ भाजी व फळ विक्रेत्यांना एकत्र बसवण्यात यावे अन्यथा भाजीविक्रेत्यांसह विविध पक्षांच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेड ,शिवसेना (उबाटा), काँग्रेस आय ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,एम आय एम ,वंचित बहुजन आघाडी आणि माकप या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिला.


नागरिक सम्यस्यांबाबत विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने घेतली नगर परिषद मुख्याधीकाऱ्यांची भेट

भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शहरातील विविध भागात जागा उपलब्ध करून देण्याची केली मागणी


आपला ई पेपर 

परळी वैजनाथ शहरातील वेगवेगळ्या नागरी सम्यस्यांबाबत विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने  नगर परिषद मुख्यधकारी त्र्यंबक कांबळे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शहरातील विविध भागांत सर्व मूलभूत सुविधांसह जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले.

संभाजी ब्रिगेड, शिवसेना (उबाठा) काँग्रेस आय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट, वंचित बहुजन आघाडी, एम आय एम, आणि माकप या पक्षाच्या शिष्टमंडळाने आज भेट मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन परळी शहराचा विस्तार व लोकसंख्या विचारात घेता फळ व भाजी मार्केट एका जागेवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर शहराच्या विविध भागात जसे की छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स मागील जागा, खाडी नाली वरील कॉम्प्लेक्स, गोपाल टॉकीच्या पाठीमागील जागा व महात्मा ज्योतिबा फुले मार्केटचे पुनरुज्जीवन करून या जागेत भाजीपाला व फळ विक्रेत्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देऊन त्यांना तिथे विक्रीसाठी परवानगी देऊन परळीतील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणे करून त्या त्या परिसरातील नागरिकांना भाजी /फळ खरेदी कमी वेळेत व कमी मेहनती मध्ये मिळेल. अन्यथा विविध पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.


विविध नागरी समस्यांबाबत शिष्टमंडळाने केली चर्चा

राष्ट्रमाता जिजामाता उद्यानातील स्वच्छता गृह तत्काळ सुरू करणे. उद्याना समोर वाहन पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतूक समस्येवर तोडगा काढणे. राणी लक्ष्मीबाई टॉवर ते एकमिनार मस्जिद या संपूर्ण स्टेशन रोडवरील दोन्ही बाजूच्या फुटपाथवरील अतिक्रमण काढून लोकांना चालायला जागा उपलब्ध करणे, तसेच जड वाहनांना प्रवेश बंदी करणे आदी विषयांवर विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने नगर परिषद मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्यासोबत चर्चा केली. लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करू असे आश्वासन यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी संभाजी ब्रिगेड, शिवसेना (उबाठा), काँग्रेस आय ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट, एम आय एम,वंचित बहुजन आघाडी आणि माकप या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळास दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या