Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR |पोदार लर्न स्कूल येथे डोळ्यांचे आरोग्य आणि काळजी डॉ.गोपाल झंवर यांनी केले विषयावर मार्गदर्शन

आपला ई पेपर 



मित्रहो 
संपूर्ण महाराष्ट्रभर डोळे येण्याची साथ चालू आहे तरी मी आपणास आय ड्रॉप चा एक फोटो शेअर करीत आहे जनहितार्थ

या ड्रॉप चा एकाच दिवसात सकाळी दोन थेंब व संध्याकाळी दोन थेंब असे टाकल्यावर डोळ्यांना पूर्णपणे आराम पडतो तरी कृपया कोणीही निंबोळी ट्यूब वापरू नये त्यामुळे डोळ्यांचा त्रास जास्त वाढतो या ड्रॉप ची किंमत फक्त 24 रुपये अशी आहे.
संपादक- संतोष बारटक्के


बीड जिल्ह्यामध्ये डोळे येण्याच्या संसर्गामध्ये अद्याप लक्षणीय वाढ झालेली नाही.मात्र सध्या सवर्ञ पाऊस सुरू असल्याने हवेतील आर्द्रता वाढून डोळे येण्याची विषाणूजन्य साथ पसरू शकते.ही साथ अत्यंत सांसर्गिक आहे. तिचा प्रसार रोखण्यासाठी डोळ्यांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे.तसेच जिल्हयामध्ये डोळे येण्याची साथ पसरू नये म्हणून आरोग्यविषयक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.अशी माहिती सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ श्री डॉ.गोपालजी झंवर यांनी PODAR |राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे आज विद्यार्थ्यांना डोळ्यांचे आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी विशेष उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.



महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत.वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सर्व सरकारीआणि खासगी दवाखान्यांना सतर्क केले आहे.जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे,डोळे येण्याची साथ पसरू नये यासाठी ज्या परिसरात अधिक रुग्ण आहेत, तेथे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचारी घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करत आहे.याबाबत जनजागृती करून आवश्यक माहिती दिली जात आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये या आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध केली आहेत तरीही शाळेतील विद्यार्थ्यांना याविषयी सखोल माहिती व ज्ञान प्राप्त होणे या उद्देशाने PODAR |राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी,सचीव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अशी माहिती उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी दिली आहे. 


संसर्गाची लक्षणे


डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अ‍ॅडिनो व्हायरसमुळे होतो.

डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येणे, यांचा क्षणांमध्ये समावेश होतो.

PODAR |विद्यार्थ्यांना आवाहन

पावसामुळे माशा किंवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तर तो परिसर स्वच्छ ठेवावा.

ज्या व्यक्तीला डोळे आले असतील त्याने सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे

डोळ्याला वारंवार हात लावू नये, तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे

एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.

कपडे, टॉवेल आणि चादरी स्वतंत्र ठेवाव्यात, जेणेकरून रोगाचा प्रसार कुटुंबातील इतर सदस्यांना होणार नाही

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना शाळेत पाठवू नये.

डोळ्याचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी आजाराची लक्षणे आढळल्यास जवळच्या  रुग्णालयात, दवाखान्यात,आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावा.असेही ते यावेळी म्हणाले..


*PODAR | राजस्थानी पोदार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा एक तास चौफेर वाचनासाठी  | विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग...*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_27.html*

*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या