Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PODAR |पोदार स्कूलचा अनोखा उपक्रम भारतीय परंपरानुसार संस्कृत मंत्र...

आपला ई पेपर

परळी प्रतिनिधी

PODR |राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल व स्वामी श्रध्दानंद गुरुकुल आश्रमातील 50 विद्यार्थी यांच्या संयुक्त उपस्थितीत शहरातील आर्य समाज मंदिर येथे आज दुपारी 12वा.अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय परंपरानुसार संस्कृत मंत्राचे उच्चारण करून या रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना स्वामी गुरुकुलचे आचार्य सत्येंद्र आर्य म्हणाले की,


गुरुकुल शाळा जिथे विद्यार्थी आपल्या कुटुंबापासून दूर गुरूच्या कुटुंबाचा भाग बनून शिक्षण घेतात. हा भारताचा प्राचीन इतिहास आहे.प्रसिद्ध आचार्यांच्या गुरुकुलात शिकलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वत्र आदर होता.

परळीतील आर्य समाज मंदिर संलग्न असलेल्या स्वामी श्रध्दानंद गुरुकुल आश्रमात आजही 50 विद्यार्थी जिथे वयाच्या आठ-दहाव्या वर्षीपासून विद्यार्थी  शिक्षकांच्या सहवासात राहून शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी गुरूंच्या सूचनांचे पूर्णपणे पालन केले. गुरुकुलात स्वतःच सर्व नित्य काम करत असत.ते स्वतःचे गरजेचे साहित्य स्वतः तयार करतात..

PODAR |शाळेचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून तर सचीव बद्रीनारायण बाहेती,उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला.

यावेळी गुरुकुल परळी अध्यक्ष जुगलकिशोरजी लोहिया, मंत्री उग्रसेनजी राठोर, स्वामी सोममुनिजी, वीरेंद्रजी शास्त्री नयनकुमारजी, स्वामी श्रद्धानंद गुरुकुल आश्रमातील आचार्य सत्येंद्र आर्य व त्यांचे सहकारी तसेच विद्यार्थी गण उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी PODAR |पोदार लर्न स्कूलच्या शिक्षिका सौ.निता बळवंत,सौ. मनीषा वाघ, शिक्षक बालाजी आघाव यांनी परिश्रम घेतले.


*GOOD | NIGHT | SONG | आठवणीतील गीत...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/good-night-song_29.html*

*चक दे इंडिया म्हणत मुलींनी जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_94.html*

*यांचा बंदोबस्त करणार कोण ? तब्बल 70 जणावर पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्लाबोल..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/70.html*

*आठवणीतील गीत..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/good-night-song.html*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या