Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत बचपन स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरे

 


आपला ई पेपर |


परळी|प्रतिनिधी

परळी येथे राजस्थानीज चॅरिटेबल संचलित बचपन स्कूलमध्ये आज दि. 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सोहळा उत्साहात साजरी करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दीपा बाहेती,तर प्रमुख पाहुण्या म्हणून राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या उपाध्यक्षा सौ.प्रेमा बाहेती व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

एक विशेष संदेश देणारी बाब म्हणजे यावेळी मुलींनी मुलींनाच राखी बांधली आणि...


 यात विशेष नाते जोपासणारी एक मोठी बहीण दुसऱ्या लहान बहिणीची भावा येवढीच काळजी घेत असते, 

भावासरखीच लहान बहिणीच्या पाठीशी खंबीर प्रमाणे उभा असते हा विशेष संदेश या रक्षाबंधनाच्या या सोहळ्यात दिसून आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय परंपरेनुसार रक्षाबंधन का? साजरे केले  जाते हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले यावेळी त्यांना राखी कशी तयार होते व आपल्या रक्षाबंधनाचे महत्व काय आहे. याचेही प्रात्यक्षिक दाखवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अशी माहिती बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दीपा बाहेती,शालेय व्यवस्थापन समितीचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे.

परळी येथे राजस्थानीज चॅरिटेबल संचलित बचपन स्कूलमध्ये सदैव  विद्यार्थीना कृतीतून शिक्षण देण्याचे निरंतर कार्य राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी व सचिव बद्रीनारायण बाहेती तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सहसचिव धीरज बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या