Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अनमोल गिफ्ट कौतुकास्पद |परळीत "या" भाऊ बहिणीचे सर्वत्र कौतुक..

परळीत एका बहिणीच्या किडनीमुळे भावाला मिळाले जिवदान


स्पेशल ...रक्षाबंधना निमित्त शर्मा बहीण भावाच्या नात्यावर ....  

@ राधिका शर्माचा तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सत्कार केला होता.

आपला ई पेपर |परळी | येथील ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद शर्मा यांचा मुलगा  गोपाळ शर्मा यानी तीन वर्षांपूर्वी सहज तपासणी केली असता दोन्ही  (किडनी) निकामी झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. हे धाकट्या बहिणीच्या लक्षात आले असता आई-वडिल आणि घरात इतर कुणीही करता नव्हता भावा शिवाय कोण ? अश्या प्रसंगात कुटुंबाच्या पाठीशी  ताकतीने संकटांना सामोरे जात कुटुंबाची अत्यंत स्वयंस्फूर्तपणे व तितक्याच धिरोधात्तपणे धाकटी बहीण हीने  (किडनी) देऊन भावाच्या पाठीशी  भक्कमपणे उभी राहिली. 


कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता अवघ्या २० व्या वर्षी सर्वोच्च दान दिले आणि आपल्या भावाला मृत्युच्या जबड्यातून अक्षरशः बाहेर काढले. बहिणीचा त्याग कामी आला आणि भिन्न रक्तगटाचे मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीही झाले.आता दोघेही आपआपले

करिअर घडवण्यासाठी व आयुष्यात उभे राहण्यासाठी पुन्हा एकदा उत्तमरीत्या सज्ज झाले आहेत.

परळीत बहीण-भावाच्या पवित्र नात्याला आणखी उदात्त करण्याचा प्रयत्न केला आहे तो परळी वैजनाथ येथील राधिका या २० वर्षांच्या या युवतीने. गोपाल या तिच्या २२ वर्षांच्या सख्ख्या भावाचे दोन्ही (किडनी) निकामी झाल्याचे  चाचणीवरुन स्पष्ट झाले आणि कुटुंबाला मोठा धक्काच बसला होता.


मूत्रपिंड प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याने स्पष्ट झाले. तोपर्यंत डायलिसिस सुरू झाले होते आणि दात्याचा शोध यक्ष प्रश्न होता. गोपालच्या वडिलांना उच्चरक्तदाबाचा त्रास होता, तर आईच्या एका मूत्रपिंडाची समस्या होती.


 अखेर राधिकाने मूत्रपिंडदानाचा मनोमन निर्णय आई-वडिलांना बोलून दाखवला. मात्र आई-वडील काही तयार होईना. पुढच्या सगळ्या उभ्या आयुष्याचे काय, लग्नाचे काय, अशा सगळ्या प्रश्नांमुळे अवघ्या २० वर्षांच्या मुलीचे किडनीदान हे आई-वडिलांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले. मात्र दुर्दैवाने दुसरा कोणताही पर्याय समोर येत नव्हता आणि जवळजवळ दोन वर्षांपासून गोपालचे डायलिसिस सुरू होते. 


साहजिकच प्रत्यारोपणासाठी उशीर होत होता आणि राधिका हट्टाला पेटल्यामुळे शेवटी आई-वडीलांनी परवानगी दिली.मात्र राधिकाच्या चाचण्या केल्या नंतर दोघांचे रक्तगट भिन्न असल्याचे लक्षात आले. परंतु भिन्न रक्तगटाचे प्रत्यारोपण निश्चितपणे यशस्वी होऊ शकते, असा विश्वास डॉक्टरांनी दिल्यानंतर प्रत्यारोपणाची तयारी सुरू झाली. अखेर २४ डिसेंबर २०२१ रोजी छत्रपती संभाजी नगर शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. आणि ती यशस्वी झाली.


मला माझा भाऊ पुन्हा एकदा ठणठणीत हवा होता आणि त्यासाठी मी काहीही करण्यास तयार होते. अर्थात, प्रत्यारोपण उत्तम झाले आणि मला काहीही त्रास नाही. त्यामुळे मी सगळे काही करू शकते.


- राधिका शर्मा

मूत्रपिंडदानातून मला मिळालेले नवीन आयुष्य हे माझ्या बहिणीने मला दिलेले अनमोल गिफ्ट आहे. केवळ भाऊच नव्हे तर बहीणदेखील आपल्या भावासाठी काहीही करू शकते, हेच यातून अधोरेखित झाले आहे.

गोपाळ शर्मा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या