Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLi | स्वातंत्र्याच्या विचाराचा पाया लोकमान्य टिळकांनी रचला | प्रा.डॉ विनोद जगतकर

विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची गरज |प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे


आपला ई पेपर

परळी वैजनाथ टिळक हिंदूवादी होते, पण त्यांनी इतर कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही. प्रचंड स्मरणशक्ती असलेले काँग्रेसचे नेते व स्वातंत्र्याच्या विचाराचा पाया लोकमान्य टिळकांनी रचला असे प्रतिपादन प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी केले तर विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांनी केले.

              येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मंगळवारी (ता ०१) आयोजित आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विनोद जगतकर, क्रिडा विभाग प्रमुख प्रा. डॉ प्रविण दिग्रसकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना प्रा डॉ जगतकर म्हणाले की, लोकमान्य टिळक बालपणापासून निडर,धाडसी होते. देशाला स्वातंत्र्य अगोदर मिळाले पाहिजे असा त्यांचा जहाज विचार होता. तर ज्या आण्णाभाऊंनी वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास केला तेच आण्णाभाऊ नंतर विमानाने मास्को पोहचले.ते आपल्या साहित्याच्या जोरावर, आण्णाभाऊंनी पंतप्रधान नेहरुंची भेट टाळली होती. असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. प्राचार्या डॉ देशपांडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, आजच्या काळातही महामानवाच्या विचारांचा जागर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी प्रा डॉ प्रविण दिग्रसकर सह विद्यार्थी वैष्णवी बोबडे, तनुराणी गित्ते, आकांक्षा मुरकुटे, अश्विनी कराड,मुस्कान शेख यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्रविण फुटके, सूत्रसंचालन समृद्धी फड,प्रतिक्षा हाके यांनी तर आभार योगिनी गित्ते हीने मानले. कार्यक्रमास प्रा.प्रविण नव्हाडे, प्रा.विना पारेकरसह विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*परळीत पोदार लर्न स्कूल येथे धाडसी कवायतीतून जगण्यासाठी कलाकारांची ‘सर्कस’*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_1.html*


*स्वर्गीय जोशी काकाच्या स्मृतित.. दररोज तुम्हाला या लिंकवर एक सुरेल आवाजात गाणे ऐकायला मिळेल...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post.html*

*रेल्वेच्या डब्यात आढळला |अज्ञात महिलेचा मृतदेह |पोलिसांचा तपास सुरू*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_77.html*

*शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी 3ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार |कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीमुळे मुदत वाढ*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/3_31.html*

*थेट live...Day 6 परळीत पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथा*👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/live.html*

*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या