Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

3 ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार |कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीमुळे मुदत वाढ

राज्यात आतापर्यंत एक कोटी पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला पीक विमा..


 मागील 24 तासात सात लाख वीस हजार शेतकऱ्यांची नोंद

आपला ई पेपर

मुंबई पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती. 


आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात 7 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरला आहे. मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. 

त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबीमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने केंद्र सरकार कडे विनंती करून आता पीकविमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. तर उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.


*मोठी बातमी | पिक्चर अभी बाकी है..मेरे दोस्त*

*|नरेंद्र मोदींची |शरद पवारांनाच | मोठी ऑफर ?|राष्ट्रवादीसोबत चर्चा..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_24.html*

*"पिकं तुडवू नका रे... आधीच थोडं उगवलं..*
*..आणखी त्यांचे नुकसान करू नका!" कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_43.html*

*कौतुकास्पद |कृषिमंत्री धनंजय मुंडेनी |अवघ्या काही तासात दिला आदेश..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/36.html*

*हे..परळीकर म्हणून हे वेदनादायी आहे...*
*आपला ई पेपर |Parli|*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_66.html*

*मोठी बातमी...
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*