Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLi |उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

आपला ई पेपर


परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत, त्यांना अभिवादन करून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे, प्रमुख अतिथी तथा भाजपाचे युवा नेते आश्विन मोगरकर, दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी श्रीराम लांडगे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.


 याबाबत माहिती अशी की, संबंध महाराष्ट्रामध्ये १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती  साजरी करण्यात येते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यामध्ये विपुल लेखन केलेले आहे. कादंबरी लेखन, नाटक, पोवाडे, कथालेखन आदी क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य असून त्यांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. कामगार वर्गावर होत असलेल्या अन्यायावर आपल्या साहित्यातून त्यांनी टीका केली. दलित साहित्याचे जनक असणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज येथील परळी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.


    याप्रसंगी परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे, प्रमुख अतिथी तथा भाजपाचे युवा नेते आश्विन मोगरकर, दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी श्रीराम लांडगे, डॉ. रामधन कराड, मेट्रन गायकवाड सिस्टर परळी उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सिस्टर, ब्रदर आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या