Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|Beed |बीडमध्ये एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या|आरोपी फरार |तपास सुरू

आपला ई पेपर | Beed |


बीड शहरातील एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे.शहरापासून काही अंतरावर असलेल्या चऱ्हाटा रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला ही घटना घडली आहे.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.सध्या गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात वारंवार गंभीर गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. नुकतीच शहरात 30 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. 

प्राथमिक मिळालेल्या माहितीवरून पांडुरंग नारायण मानेरा. आनंदवाडी,ता.जि.बीड असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.याघटनास्थळावर मृतदेहाच्या बाजूलाच MH-23 AM - 7094 या क्रमांकाची दुचाकीही सापडली आहे. ही दुचाकी कुणाची आहे याचा शोध सुरू आहे

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. 

नेमकी तरुणाची हत्या कोणी केली..? हत्येचे कारण काय ..? याचा तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.बीड शहरापासून काही अंतरावर ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या