Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीसाठी धोक्याची घंटा..NCP परळीकरांसाठी उद्या करणार एलगार...

 आपला ई पेपर |Parli|


परळी नगरीची आणि ग्रामीण भागातील अनेक गावांची "पिण्याच्या पाण्यासाठी" नागापूर वाण प्रकल्प ही "लाईफ लाईन" असून आपल्या भागात आणि धरण क्षेत्रात पाऊस काळ न झाल्याने नागापूर धरणाचा पाणीसाठ्यात काहीच वाढ झाली नाही.

आज अधिकृत माहिती घेतली असता नागापूर वाण प्रकल्पात सद्य: स्थीतीत पाणी साठा हा केवळ ५ द.ल.घ.मी असून एकूण क्षमतेच्या २४% पाणीसाठाच शिल्लक आहे.

ही धोक्याची घंटा असून परतीचा पाऊस जर झाला नाही तर मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.परळी प्रशासनाने तात्काळ या गोष्टीची गंभीर दखल घेत अनधिकृत उपसा बंद करावा तसेच परळी आणि विविध गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेले जलआरक्षण हे प्रशासनाने संरक्षित करणे गरजेचे आहे.

तेंव्हा उद्या सोमवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन द्यायचे असून  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात यावे ही नम्र विनंती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी वैजनाथ

*रेकॉर्डब्रेक सभेची तयारी अजितदादा व धनुभाऊवर प्रेम करणारी लोकं खूप आहेत...*
👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_37.html*

*ही हत्या म्हणजे डॉ.नरेंद दाभोळकर सारख्या  निस्वार्थी विचारची हत्या होय|परळी अंनिस*👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_31.html*

*18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यु..भीषण स्फोट कारण अद्याप अस्पष्ट*👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/18.html*

Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या