Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ही हत्या म्हणजे डॉ.नरेंद दाभोळकर सारख्या निस्वार्थी विचारची हत्या होय|परळी अंनिस



स्मृतिदिनानिमित्त परळीत निर्भय मॉर्निग वॉक...

आपला ई पेपर |परळी |प्रतिनिधी 

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर यांची 2013 मध्ये 20 ऑगस्ट रोजी पुण्यात हत्या करण्यात आली व विवेकाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी परळी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेच्या वतीने जिजामाता उद्यान येथे सकाळी 7:00 वाजता  निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले.

   या मॉर्निंग वॉक मध्ये डॉ नरेंद्र दाभोळकर यांची प्रतिमा हातात घेऊन व घोषणा देत हा मॉर्निंग वॉक सुरु झाला. नंतर डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन आभिवादन करण्यात आले. याप्रसंगी परळी येथील अंनिसचे पदाधिकारी प्रा विलास रोडे, प्रा दासू वाघमारे, अनुप कुसुमकर , नवनाथ दाणे,शौकत पठाण, विकास वाघमारे,मंगेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले 

     या मॉर्निग  वॉक मध्ये परळीतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रा. विलास रोडे, प्रा. दासू वाघमारे, शौकत पठाण, अनुप कुसुमकर, विकास वाघमारे, प्रा. प्रदीप बुकतर , अशोक मुंडे,ब्रह्मानंद कांबळे, नवनाथ दाने, विजयानंद रोडे,राजेंद्र जाधव, गोपाळ आघाव ,मंगेश पवार,अजले यांच्यासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या