Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

रेकॉर्डब्रेक सभेची तयारी अजितदादा व धनुभाऊवर प्रेम करणारी लोकं खूप आहेत...


27 तारखेची सभा कोणालाही उत्तर नाही, जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन मांडण्यासाठी धनंजय मुंडे


 आपला ई पेपर 

बीड दि.20 येत्या 27 तारखेला बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल भाई पटेल, प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्य मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न होणार असून, ही सभा कोणत्याही सभेचे उत्तर किंवा कुठल्याही नेत्याला उत्तर देण्यासाठी नसून, आमच्या सरकारचा बीड जिल्ह्यासह राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन जिल्ह्याच्या जनतेसमोर मांडण्यासाठी आहे, असे मत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत व्यक्त केले आहे. 

बीड शहरातील सनराईज हॉटेल येथे या सभेच्या नियोजनार्थ आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्ह्याभरातून लागलेली उपस्थिती पाहुन बैठकीलाच सभेचे स्वरूप आले होते. 

बीड जिल्हा हा कायम दुष्काळी, मागासलेला आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून गणला जातो. ही ओळख पुसून टाकण्यासाठी विकासाची दृष्टी असलेल्या अजितदादांची आम्ही साथ देत आहोत. भविष्यात ही ओळख पुसून प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याचे आमचे व्हिजन असून, तेच या सभेच्या माध्यमातून मांडायचे असल्याने या सभेची व्याप्ती संपूर्ण बीड जिल्ह्यात लागू होते, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

कोणालाही उत्तर द्यायचेच असेल तर आम्ही आमच्या कामातून, कर्तृत्वातून उत्तर देऊ, सभेतून नाही, असे म्हणत धनंजय मुंडेंनी 17 तारखेला झालेल्या सभेला जनताच 2024 च्या निकालातून उत्तर देईल, असे म्हटले. 

बीड जिल्ह्याचा विकास, सन्मान आणि अस्मिता व दुष्काळ मिटवण्यासाठीचे व्हिजन देण्याची ही सभा असणार असल्याचे त्यांनी सांगून दादांची दृष्टी विकासाची आहे, त्यासाठीच आम्ही दादांच्या पाठीशी असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटले.

या वेळी बैठकीला आ.प्रकाश दादा सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडित, आ.बाळासाहेब काका आजबे, विजयसिंह पंडित, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, कल्याणराव आखाडे, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्‍वर चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ऍड. प्रजाताई खोसरे, अशोकराव डक, राजकिशोर पापा मोदी, दत्ता पाटील, जयसिंह सोळंके, शिवाजी राऊत, माधवराव निर्मळ, बबन गवते, रामकृष्ण बांगर, दशरथ वनवे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर, परळीचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, बाजीराव धर्माधिकारी, विलास सोनवणे, नारायण शिंदे, अविनाश नाईकवाडे, महादेव धांडे, सतीश शिंदे, विष्णूपंत सोळंके, संगीताताई तुपसागर यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, युवक तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

पुढे बोलताना सभा रद्द करण्याची बातमी प्रश्‍नार्थक चिन्ह देऊन दाखवण्यात आली, संदिग्धता निर्माण झाली. बीड जिल्ह्यावर आणि आमच्यावर सर्वांचेच लक्ष आहे. असो, परंतु जिल्ह्याचे मागासपण दूर करणे ही आमची बांधिलकी असल्याचे सांगून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आम्हाला ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख पुसून टाकायची आहे, त्यासाठी आम्ही सत्तेसोबत असल्याचे त्यांनी म्हटले. पुरोगामी विचार आणि वसा कधीच सोडला नाही आणि सोडणारही नाही. जिल्हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे, सर्वांनी ताकतीने लोकांना घेऊन यायचे आहे, सर्वाधिक लोक हे बीड विधानसभा मतदारसंघातून येतील, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. सभेची जय्यत तयारी होत असून दादा काय बोलणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.


यावेळी आ. प्रकाशदादा सोळंके यांनी माजलगाव मतदारसंघातील तीनही तालुके मिळून 25 हजार पेक्षा अधिक लोक सभेला येतील, अशी व्यवस्था आपण करत असल्याचे सांगितले. 


 माजी आ.अमरसिंह पंडित यांनी गोदावरी खोऱ्यात अजितदादांच्या माध्यमातून झालेल्या व प्रस्तावित असलेल्या कामांची आठवण करून  देत गेवराई मतदारसंघातून सर्वाधिक लोक येतील असा विश्वास व्यक्त केला. 


आ. बाळासाहेब आजबे यांनी आपला मतदारसंघ तीन तालुक्यात विखुरलेला असला तरीही आमच्यात एकजूट खूप आहे, अजितदादा व धनुभाऊवर प्रेम करणारी लोकं खूप आहेत, त्यामुळे आमच्या मतदारसंघातून जास्तीत जास्त लोकांना आणण्याचे नियोजन करत असल्याचे म्हटले.

बीड मतदारसंघातून सर्वात जास्त लोक स्वयंप्रेरणेने येतील, असा विश्वास ज्येष्ठ नेते बबन बापू गवते यांनी व्यक्त केला. कल्याणराव आखाडे, ऍड. राजेश्वर चव्हाण, प्रज्ञाताई खोसरे आदींनीही आपले विचार मांडून आपापल्या मतदारसंघात व भागात सुरू असलेल्या जोरदार नियोजनाची माहिती दिली. तर अविनाश नाईकवाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*ही हत्या म्हणजे डॉ.नरेंद दाभोळकर सारख्या  निस्वार्थी विचारची हत्या होय|परळी अंनिस*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_31.html*

*18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यु..भीषण स्फोट कारण अद्याप अस्पष्ट*👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/18.html*

Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या