Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिरात नाथ प्रतिष्ठाण कडून आकर्षक सजावट

 








प्रत्येक श्रावण सोमवारी सुंदर फुलांची सुंदर आरास ...

आपला ई पेपर |PARLI-BEED|

श्रावण सोमवार निमित्त ना.धनंजय मुंडें हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण कडून वैद्यनाथ मंदिरात आकर्षक फुलांची सजावट 

परळीत श्रावण सोमवार यानिमित्ताने कृषीमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत संपूर्ण वैद्यनाथ मंदिर विविध फुलांच्या सजावटीने बहरले असून अत्यंत आकर्षक सजावट व विविध आकर्षक फुलांची आरास मंदिर परिसर, गाभारा व सर्व ठिकाणी करण्यात आली आहे. मंदिर गाभारा व परिसरात झेंडूसह निशिगंधा, गुलाब, जरबेरा, शेवंती, अर्केट, लिलिअम, ब्लुडेझी यासह सुमारे 21 प्रकारातील फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 

महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिरात पवित्र श्रावण महिन्यात या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात; त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी याच पद्धतीने नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने मंदिरात आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजावट करण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ प्रतिष्ठान यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या