Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यु..भीषण स्फोट कारण अद्याप अस्पष्ट

 आपला ई पेपर


बीड शहरातील सर्कस ग्राऊंड भागात भीषण स्फोटमध्ये १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी १२ च्या सुमारास घडली. स्फोट नेमका कशाचा झाला याचे कारण अद्यापर्यंत समजूशकले नाही.

बीड शहरातील नगर रोड भागात गौरी कलर या नावाने दुकान असणारे विकास डावकर यांचा प्रसाद हा 18 वर्षाचा तरुण मुलगा. शिक्षण घेणाऱ्या प्रसादच्या बेडरूममध्ये रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की त्यामध्ये बेडरूम पूर्णपणे जळून खाक झाली. या ठिकाणी असलेला प्रसाद हा देखील यामध्ये मृत्युमुखी पडला. स्फोट एवढा भीषण होता की घराला तडे गेले आहेत. नेमका स्फोट कशाचा झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या