Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत खुनाचा गुन्हा दाखल आरोपी मयत बंडू मुंडे यांची इनोव्हा कारसह फरार...

आपला ई पेपर


परळी शहर पोलीस ठाणे हद्दीतील बायपास कॉर्नरला जिरेवाडी शिवारात गुत्तेदार आत्माराम उर्फ बंडू निव्रती मुंडे राहणार कन्हेरवाडी‌ यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

आत्माराम मुंडे हे गुत्तेदार असून शेतकरीही होते. मिळालेल्या माहितीनुसार आत्माराम मुंडे हे काल रात्रीपासूनच घरून निघून गेले होते मात्र ते परत आलेच नाहीत.

आत्माराम मुंडे यांचे बायपास कॉर्नरला शेत असून त्या ठिकाणी पत्राचे शेड आहे त्याच ठिकाणी त्यांचा खून झाला असल्याचे आज रोजी उघड झाले आहे. घटनास्थळी परळी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून पोलिस पंचनामा सुरू आहे.

ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर व पोलीस उपाधीक्षक चोरमले यांना देऊन ते आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, गोविंद कांदे गोविंद एलमा विष्णू फड पंडित पांचाळ यांच्यासह त्वरित दाखल झाले आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

या झाल्या घटनेची मयत आत्माराम उर्फ बंडू निव्रती मुंडे यांचा भाऊ शिवाजी निवृत्ती मुंडे रा. कनेरवाडी तालुका परळी यांच्या फिर्यादीनुसार संशयित मयत मुंडे यांचा वाचमन महेश नामदेव रोडे व दुसरा आरोपी पवन भीमराव रोडे दोघेही राहणार कन्हेरवाडी तालुका परळी यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गु र् नंबर १२८/२०२३ कलम ३०२, ३४ भादवी नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी मयत आत्माराम उर्फ बंडू मुंडे यांची इनोव्हा कार क्रमांक एम एच ४५/ झेड ०१११ सह फरार झाले आहेत. संशयित आरोपींनी गुत्तेदार आत्माराम मुंडे यांची हत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास ठाण्याचे प्रभारी चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ हे करीत आहेत.

*नोकरीसाठी सिलेक्शन कर्तव्यावर रुजू व्हायला जाणाऱ्या 'तेजस'वर काळाची झडप...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_97.html*

धक्कादायक |भीषण अपघात|*

*एक खासगी बस अपघातात बसमधील 26 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू*

https://aplaepaper.blogspot.com/2023/07/26.html

*श्रीक्षेत्र परळी वै येथे प्रथमच श्री नर्मदा पुराण कथा हा संगीतमय कथा कार्यक्रम होणार...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_44.html*

*परळीत पोलीस पंचनामा सुरू |गुत्तेदार मुंडे राहणार कन्हेरवाडी‌ यांचा खून ?*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post.html*

*Join the Whatsup*
👇👇👇
https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या