Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक पदी डाॅ. ए. बी.माने यांची निवड

केडीसीसी बँकेमध्ये कृषी अधिकारी ते मुख्य कार्यकारी अधिकारी हा २५ वर्षांचा अनुभव       


कोल्हापूर, 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक पदी डाॅ. ए. बी. माने यांची निवड झाली. डॉ. श्री. माने  सध्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

 देशातील सर्वात मोठी राज्य सहकारी बँक असा लौकिक असलेल्या एमएससी बँकेवर जिल्हा सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांमधून मुख्य सरव्यवस्थापक पदी निवड होणारे डॉ. श्री. माने हे पहिलेच अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व केले आहे. बँकेने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासन व बोर्ड विभागाची व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे.

बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कार्यकारी समितीच्या बैठकीत श्री. माने यांना शुभेच्छा देण्यात आल्या व येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे.

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या