Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भीषण अपघात|एक खासगी बस अपघातात बसमधील 26 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू

 आपला ई पेपर


राज्यात बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. याअपघातात बुलढाणा येथील एक खासगी बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. या आगीत बसमधील 26 प्रवाशी होरपळून जागीच गतप्राण झाले. तर आठ जणांना आपले प्राण वाचवण्यात यश आलं आहे.

या आठही जणांना जबर मार लागला आहे. अपघातानंतर बस पेटल्याने बसचा जळून गेली आहे.काल प्रवाशांनी खच्चून भरून निघालेल्या या बसचा आज केवळ सांगाडाच उरला आहे.


विदर्भ टॅव्हल्सची ही खासगी बस काल संध्याकाळी 5 वाजता नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. या बसमध्ये दोन चालक होते. एका चालकाने कारंजापर्यंत ही बस चालवली होती. रात्री ही बस कारंजा येथे थांबली होती. यावेळी सर्व प्रवाशांनी कारंजा येथे थांबून जेवण केलं होतं. सर्व प्रवाशी जेवल्यानंतर ही बस पुण्याच्या दिशेने निघाली. जेवणानंतर काही प्रवासी झोपी गेले होते. काही प्रवासी गप्पा मारत होते. तर काही प्रवासी लहान लेकरांना झोपू थाथ होते.


ही बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ आली. समृद्धी महामार्गावरून ही बस जात होती. त्यावेळी रात्रीचे एक ते दीड वाजला होता. त्यामुळे सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. ही बस पिंपळखुटा गावाजवळ येताच एका खांबाला धडकली. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे ही बस पुढे असलेल्या डिव्हायडरला धडकली. त्यामुळे बसच्या टँकची डिव्हायडरला धडक लागली आणि टँक फुटला. त्यामुळे स्फोटाचा आवाज झाला अन् अचानक आग लागली.

त्यानंतर तरीही बस डिव्हायडरला घासत पुढे गेली आणि पलटी झाली. त्यामुळे प्रवाशांना बसमधून बाहेर पडणं कठिण झालं. तर एक चालक आणि इतर सात प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बसमधून बाहेर पडत स्वत:चे जीव वाचवले. रात्रीची वेळ असल्याने त्यांना इतर प्रवाशांचे जीव वाचवता आले नाही.आगीने बघात बघता रौद्ररूप धारण केलं. त्यामुळे बसमधील 26 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. या बसचा एक चालक दगावला आहे. तर दुसरा चालक  हा बचावला आहे. बस पूर्णपणे जळून खाक झाली असून बसचा केवळ सांगाडा उरला आहे. ही बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचं काम सुरू आहे.


*परळीत पोलीस पंचनामा सुरू |गुत्तेदार मुंडे राहणार कन्हेरवाडी‌ यांचा खून ?*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post.html*

*Join the Whatsup*
👇👇👇
https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या