Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

श्रीक्षेत्र परळी वै येथे प्रथमच श्री नर्मदा पुराण कथा हा संगीतमय कथा कार्यक्रम होणार...

परळीत 2 जुलैपासून श्री नर्मदा पुराण कथा प.पू.अनय रेवाशीष महाराज करणार कथा वाचन

परळी/ प्रतिनिधी


श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे प्रथमच श्री नर्मदा पुराण कथा हा संगीतमय कथा कार्यक्रम होत असून प्रसिद्ध कथा वाचक व नर्मदा पुराण कथेचे अभ्यासक प.पू. श्री अनय रेवाशीष, कैवल्याधाम आश्रम, श्रीक्षेत्र ओंकारेश्वर हे कथेचे वाचन करणार आहेत. राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व श्री नर्मदा परिक्रमा समुह महिला मंडळ परळीच्या वतीने या कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 2 ते 8 जुलै या कालावधीत परळी येथे श्री नर्मदा पुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगीक वसाहत येथे दररोज दुपारी 3 ते 6 या वेळेत कथेचा कार्यक्रम होणार आहे. श्री नर्मदा पुराण कथा संगीतमय असून ओंकारेश्वर येथील प्रसिद्ध कथा वाचक प.पू. अनय रेवाशीष हे कथेचे निरुपन करणार आहेत. संगीतमय कथा वाचन असून भाविक-भक्तांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कथेचा सर्व भाविक-भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व नर्मदा परिक्रम समुह महिला मंडळ, परळी वै. यांच्या वतीने करण्यात येत आहे.


*पोदार लर्न स्कूलच्या वतीने सेवेत रुजु सर्व डॉक्टर्सना ‘डॉक्टर्स डे’ च्या निमित्ताने घरी प्रत्यक्षपणे दिले शुभेच्छापञ...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_1.html*


*Live video हो आताही पहा..स्पेशल यशोगाथा*

*परळीच्या भूमीकन्या बंसल क्लासेस महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा पूजा बियाणी- राठी*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_82.html*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या