Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत पोलीस पंचनामा सुरू |गुत्तेदार मुंडे राहणार कन्हेरवाडी‌ यांचा खून

 आपला ई पेपर 


परळी शहर पोलीस ठाणे हद्दीतील बायपास कॉर्नरला जिरेवाडी शिवारात गुत्तेदार आत्माराम उर्फ बंडू निव्रती मुंडे राहणार कन्हेरवाडी‌ यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

आत्माराम मुंडे हे गुत्तेदार असून शेतकरीही होते. मिळालेल्या माहितीनुसार आत्माराम मुंडे हे काल रात्रीपासूनच घरून निघून गेले होते मात्र ते परत आलेच नाहीत.

आत्माराम मुंडे


यांचे बायपास
कॉर्नरला शेत असून त्या ठिकाणी पत्राचे शेड आहे त्याच ठिकाणी त्यांचा खून झाला असल्याचे आज रोजी उघड झाले आहे. घटनास्थळी परळी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून पोलिस पंचनामा सुरू आहे.

हत्या कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट नाही. या घटनेने परळी शहरात व कन्हेरवाडी गावात खळबळ माजली आहे. 

 या घटनेबाबत उशिरा माहिती मिळाल्याबद्दल परळी शहर पोलीस ठाण्यात अद्याप कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नाही.

*धक्कादायक |भीषण अपघात|*

*एक खासगी बस अपघातात बसमधील 26 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू*

https://aplaepaper.blogspot.com/2023/07/26.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या