Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Beed|धक्कादायक डाॅॅक्टर मुलाने अपयश व नैराश्यातून जन्मदात्या बापाचा केला खून

आपला ई पेपर |Beed

बीड

डाॅॅक्टर मुलाने बीडमध्ये जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी साहित्याचा मारा करत खुन केल्याची धक्कादायक घटना शहरातील अंकुश नगर मध्ये उघडकीस आली आहे. या घटनेने बीड शहरामध्ये खळबळ उडाली आहे. आईच्या फिर्यादीवरून मुलावर खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सुरू आहे.

बीड शहरातील अंकुश नगर भागात राहणाऱ्या कुलकर्णी परिवारातील मुलगा सुधीर कुलकर्णी हा २०१० मध्ये बीएएमएस मध्ये पास झाला होता. तो गेल्या तीन वर्षापासून एमडीचे शिक्षण घेत होता, परंतु यात त्याला अपयश आल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. यात त्याने आज मध्यराञी जन्मदात्या बापाचा खुन केला. 

घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला. फिर्यादी सुरेखा कलकर्णी वय ६२ यांच्या फिर्यादीवरुन मुलगा सुधिर कुलकर्णी वय ३८ यांच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

*रेल्वे स्थानक परिसरात हृदय हेलावून टाकणारी घटना*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_56.html*

*Beed | धक्कादायक डाॅॅक्टर मुलाने अपयश व नैराश्यातून जन्मदात्या बापाचा केला खून*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/beed_19.html*

**परळीत संपादक चंदुलालजी बियाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचे आयोजन...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_19.html*

*परळीत महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_41.html*

*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या