कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त चंदुलाल बियाणी यांच्या वतीने..
महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई
आपला ई पेपर Parli |परळी वैजनाथ
राज्याकृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज परळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री म्हणून नुकतीच ना. धनंजय मुंडे यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. योगायोग म्हणजे आज दिनांक 15 रोजी त्यांचा वाढदिवसही होता. यानिमित्ताने माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी ParLi |परळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई केली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.parli |परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले राणी लक्ष्मीबाई टावर,आझाद चौक आदी ठिकाणी विविध रंगाची विद्युत रोषणाई केल्यामुळे संपूर्ण परिसर झगमगाटून गेला आहे.
Social Plugin