Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वृत्तपत्रापुढील आव्हाने व समस्या या विषयावर परळीत चर्चासत्राचे आयोजन


वृत्तपत्रापुढील आव्हाने व समस्या या विषयावर परळीत चर्चासत्राचे आयोजन


असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया महाराष्ट्र, शाखा बीडच्या वतीने

 रविवारी ‘लघू व मध्यम वृत्तपत्रापुढील आव्हाने व समस्या’ या विषयावर परळीत चर्चासत्राचे आयोजन

आपला ई पेपर परळी वैजनाथ

असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया महाराष्ट्र, शाखा बीडच्या वतीने परळी वैजनाथ येथे येत्या रविवारी (दि.23) ‘लघू व मध्यम वृत्तपत्रापुढील आव्हाने व समस्या’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

परळी शहरातील नाथ रोड मार्गावरील वैद्यनाथ सहकारी औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात सकाळी 11 वाजता हे चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंदुलालजी बियाणी यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप दे.कुलकर्णी हे राहणार आहेत. 

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, राष्ट्रीय सचिव प्रवीण पाटील, राष्ट्रिय कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर गायकवाड यांच्यासह परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, वैद्यनाथ देवल कमिटीचे मा.सचिव राजेश देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई, पंचायत समितीचे मा.सदस्य श्रीराम मुंडे, परळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बालकिशन सोनी, शहराध्यक्ष जगदीश शिंदे, जेष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

संघटनेचे राज्यभरातील प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील सदस्य व विविध वृत्तपत्राचे संपादक या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत अशी माहिती संघटनेच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. 


या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुमित कुलकर्णी, सचिव मारोती गवळी, संघटन सचिव शोभा जयपूरकर, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाकडे व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे. 

दरम्यान, या चर्चासत्रानंतर संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक याच सभागृहात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री के.डी.चंडोला व राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या बैठकीत पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल  संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गोरख तावरे यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.


*जाहीर निषेध | जाहीर निषेध | परळीत सो.क्षत्रिय कासार समाजाच्या वतीने जाहीर निषेध..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_73.html*

*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या