युवा सेनेचे परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
आपला ई पेपर
परळीत बंगला,देशमुख गल्ली व रामदासी यांच्या घरापर्यंत गेल्या दोन वर्षांपासून पाईपलाईनचे काम झालेले नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यात अशुद्ध व घाण पाणी येत असल्यामुळे ते नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरत आहे.यामुळे यापरिसरात परळी नगरपरिषदेने ताबडतोड पाईपलाइन चे काम करावे या मागणीचे निवेदन युवसेनेच्या वतीने परळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना आज दि.14 जुन 2023 रोजी देण्यात आले.
युवा सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बंगला,देशमुख गल्ली तसेच रामदासी यांच्या घरापर्यंत गेल्या दोन वर्षांपासून पाईपलाईनच्या कामाबाबत कसल्याही प्रकारचे काम करण्यात आलेले नाही नवीन सिमेंट रस्ता झाला तरी काम झालेले नाही व पिण्याच्या पाण्यात नाल्यासारखे घाण,काळे व अशुद्ध पाणी येत आहे तरी याबाबतीत नगरपरिषदेचे कसल्याही प्रकारचे लक्ष नाही त्यामुळे भागातील नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आले आहे.
नगर परिषदेने तात्काळ पाईपलाईनचे काम केले नाहीतर तीव्र स्वरुपाचे आंदोलन, उपोषण करण्यात येणार असल्याचे परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे युवा सेनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.
सदरील निवेदन शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख जिल्हाप्रमुख सचिन भैया मुळूक, युवासेना कोअर कमिटी सदस्य अविनाश खापे पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख सुमित भैया कोळपे,उपजिल्हाप्रमुख रामराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना शहरप्रमुख गजानन कोकीळ,बालासाहेब देशमुख, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन चव्हाण,शैलेश कदम,सतिष कदम(गावडे),गोविंद राऊत,युवासेना उपशहरप्रमुख सागर बुंदुले,नवनाथ सरवदे,नवनाथ लोभे,विजय देवज्ञे,प्रभाकर पेंटेवार,वैजनाथ काकडे,नंदकुमार रामदासी,अर्जुन साखरे आदी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.
*धक्कादायक | परळीतील पोलीस कस्टडीमध्ये |आरोपीचा मृत्यू ? चौकशीची मागणी |*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_14.html*
*सावधान | अमेझॉनवरुन ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केला अन्...*
https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_13.html
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
Social Plugin