आपला ई पेपर online परळी / प्रतिनिधी
परळी येथील संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सिद्धिविनायक मल्टी स्टेटला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान संस्थेच्या कार्याची माहिती घेत त्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिद्धिविनायक मल्टी स्टेटच्या संचालिका संघर्ष कन्या कु. राधिका शर्मा यांनी पोलीस निरीक्षक ढोणे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या सोबत रामप्रसाद शर्मा, पत्रकार संजय खाकरे आणि रविंद्र जोशी उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांबाबत चर्चा झाली तसेच समाजहितासाठी संस्थेने राबविलेल्या कार्याचे पोलीस निरीक्षक ढोणे यांनी कौतुक केले. सिद्धिविनायक मल्टी स्टेटच्या वतीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम पुढेही सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या सदिच्छा भेटीमुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


Social Plugin